How To Identify Artificially Ripened Mango | कृत्रिमरीत्या पिकवलेला आंबा कसा ओळखायचा? जाणून घ्या या सोप्या ट्रिक्स

How To Identify Artificially Ripened Mango
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | How To Identify Artificially Ripened Mango अनेक लोकांना उन्हाळा आवडत नाही. परंतु आंबे हे केवळ उन्हाळ्याच्या सिझनला येतात. त्यामुळे आंबे खाण्यासाठी का होईना पण लोकांना उन्हाळा ऋतू लवकर यावा असं वाटतं. आंबे चालू झाले की, अनेक लोक गावाकडे जातात. कारण गावाकडे खूप आंब्याची झाडे असतात. तिथे तुम्हाला ताजे आणि एकदम नैसर्गिक आंबे खायला मिळतात. शहरामध्ये बाजारात देखील आंबे असतात. परंतु काही विक्रेते हे आंबे कृत्रिमरीत्या पिकवतात. आणि हे कृत्रिमरीत्या पिकवलेले आंबे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात. त्यामुळे आंबे घेताना आपण काळजीपूर्वक आणि पारखून घेणे खूप गरजेचे आहे.

ओरिजिनल हापूस आंबा थेट शेतकऱ्यांकडून कसा मागवायचा?

हापूस आंब्याच्या नावाने बाजारात अनेक बनावट आंबे येऊ लागले आहेत. यामुळे ग्राहकांना ओरिजिनल आंबा कुठून खरेदी करावा असा मोठा प्रश्न पडला आहे. आता यावर हॅलो कृषी स्टार्टअपने थेट शेतकऱ्यांकडून आंबा ऑर्डर करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. कोकणातील शेतकऱ्यांकडून आंबा ऑर्डर करण्यासाठी shop.hellokrushi.com या वेबसाईटवर ऑनलाईन ऑर्डर देता येते. तसेच हे आंबे घरपोच मिळत असून अगदी योग्य दरात खात्रीशीर आंबे मिळत असल्याने ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. यामुळे हॅलो कृषीच्या शेतकऱ्यांनाही थेट फायदा मिळतो आहे.

कृत्रिमरीत्या पिकवणारे आंबे हे कॅल्शियम कार्बोइडच्या माध्यमातून पिकवतात. त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जर कच्चे आंबे विकत घेतले, आणि घरी आणून ते वाळलेले गवत, पालापाचोळा, झाडांची पाने, वर्तमानपत्रांच्या कागदामध्ये ठेवले, तर ते आंबे घरच्या घरी पिकवता येतात.

बाजारात फळे पिकवण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मान्यता असलेले इथ्रेल वापरतात. गवत किंवा पाचटामध्ये आंबे पिकवण्यासाठी ठेवण्यापूर्वी एक लिटर पाण्यात दीड मिलि इथ्रेल मिसळावे. तसेच त्यात आंबे पाच ते दहा मिनिटे ठेवावे. नंतर ते पिकवण्यासाठी ठेवावे यामुळे आंबे एक-दोन दिवस आधी पीकतात. तसेच ते आंबे देठाजवळ सडत किंवा खराब होत नाही.

कृत्रिमरित्या पिकवलेला आंबा कसा ओळखायचा? | How To Identify Artificially Ripened Mango

  • हा आंबा एकदम पिवळा धमक आणि चकचकीत असतो.
  • या आंब्याला बोटाने दाबले तरी नरमपणा जाणवत नाही.
  • कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्याची साल जाड असते.
  • हे आंबे खोटे आंबे असल्यासारखे दिसतात
  • या फळांच्या सालीवर चट्टे पडून ते लवकर खराब होतात.
  • या आंब्याचा सुगंध न येता ठसका येणारा उग्र वास असतो.

नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा कसा ओळखायचा?

  • हा अंबा दिसायला थोडासा हिरवट पिवळा असतो.
  • या आंब्याला फारशी चकाकी नसते.
  • या आंब्यावर बारीक सुरकुत्या पडल्यासाख्या दिसतात.
  • नैसर्गिकरित्या पिकवलेला आंब्याचा गर पिकलेला असतो.
  • या आंब्याला बोटाने हलके जरी दाबले तरी त्यात बोटे जातात आणि तो नरम असतो.
  • हा आंबा अनेक दिवस राहू शकतो.
  • नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा हा रसाळ गोड असतो.
  • या आंब्याजवळ जातात त्याचा सुगंध सर्वत्र पसरतो.