सणासुदीच्या काळात विकले जातात बनावट ड्रायफ्रूट्स; अशाप्रकारे करा खऱ्या बदामाची पारख

Almonds

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवाळीचा सण अगदी तोंडावर आलेला आहे. दिवाळीनिमित्त आपल्या घरात अनेक गोडधोड पदार्थ होत असतात. नवीन रेसिपी देखील होत असतात. या सगळ्यांमध्ये बदामाचा वापर देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. तसेच दैनंदिन आयुष्यात देखील बदाम हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. बदामामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड, विटामिन ई यांसारखे पोषक तत्व असतात. त्यामुळे आपल्या आरोग्याला खूप फायदा होतो. सणासुदीच्या काळातही बदाम मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात. परंतु आजकाल प्रत्येक गोष्टीमध्ये भेसळ वाढलेली आहे. आणि अनेक लोक बदामामध्ये भेसळ करत आहेत. त्यामुळे ग्राहकांना बदामाचे शुद्धता ओळखणे खूप गरजेचे असते. ड्रायफ्रूट्स खरेदी करताना देखील तुम्हाला चांगले बदाम आणि निकृष्ट दर्जाचे बदाम हे ओळखता आले पाहिजेत. आज आपण बाजारात खरे बदाम ओळखण्याच्या पाच ट्रिक्स जाणून घेणार आहोत.

बदामाचा रंग

बदामाचा रंग ही त्याची मूळ ओळख असते. बदामाला नैसर्गिक रंग प्राप्त होतो. बदामाचा रंग हा हलकासा तपकिरी असतो. जो बदामाच्या विविधतेवर आणि पिकण्याच्या अवस्थेवर देखील अवलंबून असते. परंतु कृत्रिम बदामावर वेगळ्या रंगाचा लेप लावला जातो. ज्यामुळे बारामती रंग अगदी गडद किंवा काळा दिसतो. त्यामुळे सणासुदीच्या काळात बदाम विकत घेताना. तुम्ही या गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

वॉटर टेस्ट

खरे आणि नैसर्गिक बदाम पाण्यात टाकले की, पाण्यात बुडतात. तसेच काही काळ ते पाण्यात बुडतात. तर नकली बदाम हे पाण्याच्या वर तरंगत राहतात. म्हणजेच खऱ्या बदामांमध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता असते. त्यामुळे त्यांची घनता वाढते आणि ते पाण्यात बुडतात. परंतु खोट्या बदामांमध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता नसल्याने ते वर पृष्ठभागावरच तरंगतात.

बदाम हातावर रगडून बघा

तुम्ही जर बदाम हातावर रगडला आणि त्यातून रंग निघू लागला. तर तो बदाम कृत्रिम पद्धतीने बनवलेला असतो. तसेच त्या पदावर पाणी शिंपडले तर पावडर देखील दिसते. त्यामुळे तुम्ही बदाम घेताना ते बदाम हातावर रगडून बघा.

पेपर टेस्ट

तुम्ही बदाम खरेदी करताना बदामाचे शुद्धता तपासण्यासाठी त्या बदामांना कागदात गुंडाळा आणि बदामावर दाब द्या. त्यावेळी त्या बदामामधून तेल निघते. आणि कागद थोड्या वेळात गुळगुळीत होतो. परंतु जर बनावट बदाम असेल, तर त्या कागदावर कोणत्याही प्रकारचे तेल येणार नाही तो कागद कोरडाच राहील.

वासाने ओळखा

बदाम खरेदी करताना त्याची गुणवत्ता तपासणी खूप गरजेचे असते. यावेळी तुम्ही तो बदाम तोडू शकता आणि त्याचा सुगंध घेऊ शकता. जर त्यातून गोड आणि सुगंध तेलकट सुगंध आला, तर तो बदाम चांगला आहे. परंतु त्यातून तसा कोणताही सुगंध येत नसेल,तर तो बदाम कृत्रिम पद्धतीने तयार केलेला असतो.