How To Identify Fake Potatos | आज-काल दुकानातून कोणतीही गोष्ट विकत घ्यायची, म्हटली तरी त्यातून मोठ्या प्रमाणात भेसळ होत असते. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये भेसळ केली जाते. दुकानदार अगदी काही नफा मिळवण्यासाठी ते लोकांचे जीवन धोक्यात टाकत असतात. विशेषतः सण आले की या भेसळ करण्याच्या पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. परंतु आता एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आता बटाट्यामध्ये ही भेसळ होत आहे. सध्या बाजारामध्ये काही नकली बटाटे (How To Identify Fake Potatos) विकले जात आहेत. या बटाट्यांमध्ये अनेक रासायनिक पदार्थ मिसळलेले आहेत. आणि ते जास्त भावाने विकले जात आहेत. परंतु आता हे बनावट बटाटे आणि खरे बटाटे यातील फरक कसा ओळखायचा हे आपण जाणून घेणार आहोत.
नुकतेच उत्तर प्रदेशात कुठे बनावट बटाटे (How To Identify Fake Potatos) विकण्याचा प्रकार समोर आलेला आहे. आणि हे बटाटे प्रशासनाने ताब्यात देखील घेतलेले आहेत. या ठिकाणी बटाटा ताजा आणि अगदी चांगला दिसण्यासाठी अनेक प्रकारचे रासायनिक द्रव्य त्यावर फवारली जातात. आणि अनेक लोक हात बटाटा नवीन आहे, असे समजून खरेदी करतात. परंतु त्यांची फसवणूक होते. तसेच आरोग्यासाठी हे बटाटे अत्यंत हानिकारक आहे.
बनावट बटाटे कसे ओळखायचे ? | How To Identify Fake Potatos
खरा बटाटा ओळखण्यासाठी त्याचा वास घेणे खूप गरजेचा असतो. जर तो बटाटा खरा असेल तर त्यातून नैसर्गिक सुगंध येईल परंतु जर तो बटाटा बनावट असेल, तर त्यातून रासायनांचा वास येईल. आणि त्याचा रंग देखील जाईल. तुम्ही तो बटाटा कपड्यावर घासून पहावा, जर त्याच्यावरील रंग गेला तर तो बनावट बटाटा आहे असे समजावे.
तुम्ही बटाटा कापून देखील तपासू शकता. जर तो बटाटा खरा असेल, तर तो आत आणि बाहेर जवळजवळ सारख्याच रंगाचा असतो. परंतु बनावट बटाट्याचा रंग आत वेगळा असतो आणि बाहेर येत असतो. त्यामुळे जर त्या बटाट्याला माती लागली असेल, तर ती माती काढा आणि त्यानंतर तो बटाटा खरा आहे की खोटा आहे तपासा.
तुम्ही बटाटा पाण्यात पिळून देखील पाहू शकता. खरे बटाटे हे पाण्यात बुडतात. परंतु जर बटाटे बनावट असेल, तर ते पाण्यात तरंगू लागतात कारण त्यावर काही रसायने फवारलेली असतात.बत्याही रसायने पाण्यात बुडत नाही. आणि पाण्याच्या वर हे बटाटे राहता. परंतु जर ते बटाटे चांगले आणि ताजे असतील तर ते पाण्यात बुडतात.
त्याचप्रमाणे जे नकली बटाटे असतात. त्याची माती पाण्यात लगेच विरघळते. परंतु खऱ्या बटाट्यावरील मातीही लगेच विरघळत नाही. तसेच त्यावरची सालही खूप पातळ असते आणि ती माती काढल्यानंतरच निघते.
हे असे कृत्रिम बटाटे खाणे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असतात. कारण यामध्ये विविध रंग आणि रसायने असतात. यामुळे तुमच्या मुत्रपिंडाला आणि यकृताला हानी पोचू शकते. तुम्ही जर दीर्घकाळ अशा भाज्या खाल्ल्या तर त्याचा तुमच्या किडनीवर परिणाम होतो. त्यामुळे कुठलीही भाजी विकत घेतल्यानंतर तिची तपासणी करा. आणि घरी आल्यावर ती भाजी धुतल्याशिवाय वापरण्यास घेऊ नका.