PPF च्या खात्यात किती पैसा झाला जमा; वर्षात किती झाला फायदा, आता घरी बसल्या जाणून घ्या

EPF account
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या दोन दिवसांमध्ये पीपीएफवर मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे. ही चर्चा पीपीएफवर मिळणाऱ्या व्याजदर यांना घेऊन आहे. केंद्रसरकारने पहिल्यांदा व्याज दर घटवण्याचे घोषित केले. त्यानंतर काही तासातच तो निर्णय परत घेण्यात आला. पीपीएफमध्ये पैसे लावणाऱ्या लोकांना आता 1 एप्रिल 2021 ते 30 जून 2021 पर्यंत 7.10 टक्के दराने व्याज मिळेल. सरकारच्या या निर्णयाने नोकरपेशा वर्गाला ही मोठी राहत मिळाली आहे. नोकरपेशा लोकांना पब्लिक प्रोविडेंट फंड म्हणजे पीपीएफमध्ये गुंतवणूक हा चांगला पर्याय आहे. देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँक एसबीआयने खात्यांच्या संदर्भात महत्त्वाच्या प्रश्नांना उत्तर दिले आहेत. जाणून घेऊ या बाबत.

एसबीआय मध्ये पीपीएफ खाते खोलण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते?

एसबीआयने आपल्या वेबसाईटवरती सांगितले आहे की, पीपीएफ खाते खोलण्यासाठी पीपीएफ खाते फॉर्म, नामांकन फॉर्म, पासपोर्ट आकाराचे फोटो, पॅन कार्ड अथवा फॉर्म 60 – 61 फोटोकॉपी, बँकेच्या केवायसी मानकानुसार ओळख अथवा निवासी दाखला एवढे कागदपत्र पीपीएफ खाते खोलण्यासाठी लागतात. तसेच खाते उघडल्यानंतर कमीत कमी 500 रुपये ते अधिक 1.5 लाख रुपये वार्षिक गुंतवणूक केली जाऊ शकते. जास्तीत जास्त दीड लाख रकमेवरती सूट मिळणार आहे.

खातेदार पंधरा वर्षापर्यंत या खात्यामधून रक्कम काढू शकत नाही. परंतु पाच वर्षाच्या एक किंवा अधिकच्या काळातील 1 ब्लॉकसाठी अर्ज करता येऊ शकतो. PPF चे व्याजदर केंद्र सरकार ठरवते. सध्या हे व्याजदर 7.10 टक्के प्रतिवर्ष आहे. जर आपल्याला पीपीएफ खात्याची माहिती घ्यायची असेल तर, एसबीआय नेट बँकिंगमध्‍ये ‘साइन इन’ केल्यानंतर पर्सनल बँकिंगवरती आवश्यक माहिती भरल्यानंतर आपल्याला बचत खात्याचे डॅशबोर्ड दिसेल. त्यानंतर, ‘क्लिक हेर फोर बॅलेन्स’ वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला बॅलन्स दिसू शकेल. सोबतच एका क्लिकवरती इतर माहितीही आपल्याला मिळू शकणार आहे.