लाॅकडाउनमध्ये संतुलित राहण्यासाठी काय करायला पाहिजे?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

समर्पन ध्यान प्रश्नोत्तर | समर्पन ध्यान संस्थेचे प्रमुख शिवकृपानंद स्वामी यांच्या कोरोना लाॅकडाउनच्या काळात मानसिक संतुलन कसे राखावे यावर मार्गदर्शनपर प्रश्नोत्तर स्तंभ आपण चालवत आहोत. आजचा प्रश्न आहे लाॅकडाउनमध्ये संतुलित राहण्यासाठी काय करायला पाहिजे? खाली शिवकृपानंद स्वामी यांनी उत्तर दिले आहे.

मला वाटतंय मी एक सर्वसामान्य मनुष्य आहे आणि सर्वसामान्य मनुष्यानी सर्वात पहिला विचार करायला पाहिजे आपल्या हातात काय आहे? जे आपल्या हातात आहे तेच आपण करू शकतो ना! आता जस कोरोनाव्हायरस किंवा आणखी कोणताही व्हायरस,  त्या व्हायरसच्या बद्दल सर्वसामान्य माणसाला काय कळतं? काहीच कळत नाही हे लक्षात येते. तर सांगायचं तात्पर्य , हा जो विषय आहे ना हा विषय डॉक्टरांचा आहे, संशोधकांचा आहे. की,तो व्हायरस कोणता आहे? त्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे? त्याचं काय व्हॅक्सिन  शोधल पाहिजे? हे आपल्या हातात काहीच नाही आणि हे आपलं क्षेत्रही नाही असं मला वाटतं. म्हणून हे क्षेत्र आपण का नाही डॉक्टरांसाठी, सायंटिस्ट साठी, संशोधकांसाठी सोडून द्यावं?

आता दुसरा विषय ,”लॉक डाऊन “. या लॉक डाऊन विषयी आपला काय संबंध आहे ? लॉक डाऊन साठी आपण काय करू शकतो? आपल्या हातात काय आहे? आपल्या काहीही हातात नाही !असे दिसते. लॉक डाऊन सरकारनी त्या कोरोनाव्हायरस च्या परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी केलेला उपाय आहे. पहिले आपण हे समजून घेतले पाहिजे  की, सरकार कोणीही एक मनुष्य किंवा एक व्यक्ती नाही.सरकार आमच्या देशाचा सामूहिक शक्‍तीचा समूह आहे.जो समूह राष्ट्राच्या हितासाठी आणि देशात राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या हितासाठी निर्णय घेतो कारण पूर्ण राष्ट्राची आणि त्या राष्ट्रात राहणाऱ्या माणसांची सर्व जबाबदारी त्यांच्यावर असते. म्हणूनच आपले पंतप्रधान  मोदीजी इतक्या लोकांना विनंत्या करत आहेत, इतक्या प्रार्थना करत आहेत, इतक एक सारखं समजावत आहेत की, आम्हाला तुमच्या पासून काही अपेक्षा नाहीत फक्त तुमच्या पासून एकच अपेक्षा आहे “तुम्ही तुमच्या घरात राहा” बस एवढंच. तर मला वाटतं त्यांची हीच आपल्याकडून अपेक्षा आहे, आपण तेवढीच अपेक्षा पूर्ण करावी ना! मला वाटतं की आपल्या हातात फक्त घरात राहण आहे आणि लॉक डाऊन, कोरोना व्हायरस हे आपले विषय नाहीत. हे कोरोनाव्हायरस ज्यांचा विषय आहे त्याच्यावरती ते विचार करतील. लॉक डाऊन  ज्यांचा विषय आहे त्याच्यावर ते विचार करतील.आपला विषय आहे घरात राहणं, मला असं वाटतं प्रत्येकांनी आपापल्या क्षेत्रात राहून त्याच्यावर पूर्णपणे कार्य कराव.

तर आता प्रश्न आहे की आपण या स्थितीमध्ये सरकारला काय सहयोग करू शकतो ? आपण ना तर त्या व्हॅक्सिन बद्दल काही करू शकतो ना त्या व्हायरस बद्दल काही करू शकतो ,आपण काहीच करू शकत नाही. आपण लॉक डाऊन बद्दलही काही करू शकत नाही. होय की नाही ? आपण फक्त करू शकतो स्वतःच्या घरात राहणं. घरात ठेवण ,बस तेवढच करायला हवं. मला असं वाटतं की माणसाने जर संतुलित राहायचे असेल तर त्यांनी फक्त आपल्या क्षेत्रात काम करावं दुसऱ्यांच्या क्षेत्रांचा विचारही करू नये आपण दुसऱ्यांच्या क्षेत्राचा विचार करायला जातो ना! मग असंतुलन होऊन जातं .आपण कशाला विचार करायचा त्याच्याबद्दल! आपण कोणीच विचार करू नये. आपण आपल्याला संतुलित करण्यासाठी  फक्त आपल्यापुरतं रहावं .आणि दुसरं, नेहमी सकारात्मक विचार करावे की देवानी आपल्याला जर ही संधी दिली आहे त्याचा आपण काय उपयोग करावा? आपण आपल्या बायकामुलांना एवढा वेळ कधी देऊ शकलो नाही, आज चांगले आहे ना की, आज याच्यामुळे आपण आपल्या बायकामुलांना,परिवाराला एवढा वेळ देऊ शकतो. तर सांगायचं तात्पर्य ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीतून सकारात्मकता व्हावी व चांगलं व्हावं असं मला वाटतं.

आणि दुसरं जर घराला आग लागलेली आहे, तर ती आग विझवायला आपल्याला घराच्या बाहेर निघायला हवं ना घरात राहून तर ती आग नाही विझवली जाऊ शकत . तसंच आहे आता ही जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे या परिस्थितीतून निर्माण व्हायला आम्हाला या परिस्थितीतून बाहेर पडायची आवश्यकता आहे.जर आपण या परिस्थितीतच राहिलो तर आपण बाहेर नाही पडू शकत . होतं काय, दिवसभर त्याच त्या बातम्या  पाहता-पाहता आपण तीच ती स्वतः परिस्थिती बनून गेलो आहे. तर परिस्थिती वेगळी आहे आणि आपण वेगळे आहोत. तर आपण वेगळे जर अस्तित्व केले तरच या परिस्थितीतून बाहेर येऊ शकतो. आता जस घराला आग लागली तर घरात बसून घराची आग  विझवु शकतो का? नाही. आपल्याला घराच्या बाहेर पडावे लागेल आणि बाहेर पडल्यानंतर घर वेगळे आणि आपण वेगळे आहोत असा विचार करून जेव्हा आपण  घराची आग विझवू , तेव्हाच ती विझवू शकतो.

तसच जेव्हा परिस्थिती आपण नाही , परिस्थिती वेगळी आणि आपण वेगळे आहोत ,आम्हाला आमच्या परिस्थितीतुन बाहेर निघून आपल्या परिस्थितीवर मात करावी लागेल . एकदा झालं होतं ना मला मलेशियाला एक्झिक्युटिव लोकांना तणाव आला होता, टेन्शन आलं होतं म्हणून त्या कंपनीने बोलावले होते. ती पाम ऑइलची फॅक्टरी होती आणि त्या फॅक्टरीमध्ये सगळ्या एक्झिक्युटिव्हना एक टार्गेट दिल होत एक लक्ष्य दिल होत आणि ते लक्ष्य इतकं मोठं होतं की ते सगळे त्या तणावात आले होते, सगळे त्याच्या टेन्शनमध्ये आले होते. आणि माझे जेव्हा प्रवचन झाले तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्हीच तर टार्गेट झाला आहात, तुम्हीच टार्गेट झाला तर टार्गेट कोण पूर्ण करेल?  जर तुम्हाला टार्गेट पूर्ण करायचे आहे तर, तुम्ही पहिले त्या टार्गेटमधून बाहेर निघा.टार्गेट वेगळ आहे आणि तुम्ही वेगळे आहात असं जेव्हा तुम्ही व्हाल तेव्हाच तुम्ही टार्गेट पूर्ण करू शकता, आत्ता तर तुम्हीच टार्गेट झालाय. टार्गेट तुम्हीच स्वतः असताना ,टार्गेट कस पूर्ण करू शकता? अगदी तसच आत्ता जी स्थिती आहे, परिस्थिती वेगळी आहे आणि आपण वेगळे आहोत. आपण परिस्थिती नाही. तर, आपण नुसते त्या परिस्थितीतून वेगळे व्हायची गरज आहे आणि नंतर त्यातून वेगळे होऊन मग संतुलन आपोआप होऊनच जातं.

अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक – 99709 40612