आरोग्यमंत्रा | आपला दिवस आनंदात जावा असं प्रत्तेकालाच वाटत असते. तुमचा दिवस कसा जावा हे नशीबाचा खेळ नसतो तर ते सारं तुमच्या हातात असतं. तुम्ही जर लहान सहान गोष्टींचा विचार केला आणि खालील गोष्टी जाणीवपूर्वक केल्या तर तुमचा दिवस नक्कीच आनंदात जाईल यात शंका नाही.
१) सकाळी उठल्यानंतर तुमचा मूड चांगला ठेवा. झोपेतून उठल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा आणि डोळे मिटून थोडावेळ शांत बसा.
२) रोज सकाळी शांत आणि हळूवार मंद संगीत एका.
३) शरिर हलकं होईल इतका किमान व्यायाम करा.
४) शरिराबरोबरच मन हलकं होणं फार गरजेचं असतं तेव्हा शक्य झाल्यास रोज उपलब्ध वेळेनुसार ध्यान करा.
५) दिवसभर पोसिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा.