PSI-STI-ASO पुर्व परीक्षेचे एक महिन्यापुर्वीचे नियोजन…..???

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीती, भाग 26 | नितिन बऱ्हाटे

राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये कितीही कमी किंवा जास्त मार्क्स आले असले तरी लवकरच मुख्य किंवा संयुक्त पुर्व परिक्षेचा अभ्यास सुरू करायला हवा बरोबर एक महिन्यानंतर 24 मार्चला संयुक्त(PSI-STI-ASO) पुर्व परिक्षा आहे त्या परिक्षेचे एक महिन्यापुर्वीचे नियोजन सदर लेखात पाहू

मागील किमान सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी पासुन स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणा-या साठी सदर लेख आहे यात तुम्हाला संयुक्त पुर्व परिक्षेचा संपुर्ण अभ्यासक्रम आणि पटर्न माहीती असणे ग्राह्य आहे.

  PSI-STI-ASO पदांसाठी पुर्वी वेगवेगळ्या पुर्व परिक्षा घेतल्या जायच्या आता संयुक्तपणे एकच पुर्व घेतली जाते, पुर्वी प्रत्येक पदांची गरज लक्षात घेऊन पुर्व‌ला एक विशिष्ट प्रश्नपध्दती होती उदाहरणार्थ STI पुर्व‌चा पेपर अर्थव्यवस्था आणि तथ्यात्मक अधिक असायचा.परंतु आता होणार्या संयुक्तपणे पुर्व परिक्षेचा अंदाज लावणे कठिण झाले आहे, मागील संयुक्त पुर्व परिक्षेचा अंदाज घेतल्यावर संयुक्त पुर्व परिक्षा ही “मीनी राज्यसेवा GS पूर्व” परिक्षा असते असे लक्षात येते. त्यामुळे चतुरस्त्र तयारी असणे महत्त्वाचे आहे

17 फेब्रुवारी च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेवरुन‌ GS , गणित आणि बुध्दिमत्ता इत्यादी प्रश्र्नांच्या काठिण्य पातळी आधारे 2019 च्या‌ येणाऱ्या पुढील सर्व परिक्षांसाठीचा अंदाज लावणे आवश्यक आहे. तेवढी काठिण्य पातळी किंवा त्यापेक्षा अधिकसाठी उरलेल्या दिवसात तयार‌ राहणे आवश्यक आहे‌

MPSC चे विशेषतः PSI-STI-ASO परिक्षांना आतापर्यंत विचारलेले सर्व प्रश्न विश्लेषणासहित सोडवुन घ्यावेत, परिक्षेच्या दिवसांपर्यंत दररोज एक तास या प्रश्र्नांच्या वाचन आणि आकलनला देणे अनिवार्य आहे हे प्रश्र्न सर्वात चांगले मार्गदर्शक तर आहेतच शिवाय 10% प्रत्यक्ष पुनरावृत्ती आणि 20-25% अप्रत्यक्ष पुनरावृत्ती होते तसेच मागील प्रश्र्नांच्या पर्यायावरुन पुढील परिक्षेत प्रश्न तयार होण्याचे स्वरुप ही दिसुन येते त्यामुळे संपूर्ण अभ्यासात मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांना दुर्लक्षुन चालणारे नाही

अभ्यास साहित्य- ज्या विषयाला आतापर्यंत जे वाचलंय त्याचीच‌ आता उजळणी करावी नवीन साहित्य वाचु‌ नये, प्रत्येक विषयासाठी कमीत कमी साहित्य निवडणे 
फक्त एक महिना राहील्याने बेसिक साहित्य आणि मुळ संकल्पना प्राधान्याने करायला पाहिजेत

गणित आणि बुद्धिमत्ता- हमखास गुण मिळवुन देणारा विषय आहे दररोज किमान दोन तास यांच्या तयारी साठी द्यावा. मागील परिक्षांमध्ये विचारलेले गणित आणि बुध्दिमत्तेचे सर्व प्रकाराची प्रत्येकी 25-30 प्रश्र्न सोडवुन सराव करावा जेणेकरून विचारले जाणारे सर्व प्रकार परिक्षेमध्ये सहज रित्या सुटतील.

चालु घडामोडी- जानेवारी 2018 पासुन 10 मार्च‌ 2019 पर्यंतंचे सर्व चालु घडामोडी उजळणी करुन घ्यावी हे हातातील गुण सुरक्षित करुन घ्याव्येत.

महाराष्ट्र माझा – महाराष्ट्र भुगोल, इतिहास आणि समाजसुधारक इत्यादी घटकांची विशेष उजळणी या महिन्यात करुन घ्यावी, या घटकांवरील प्रश्न विशेष तयारी असणार्यांचेच बरोबर येतात.

वेळ व्यवस्थापन- PSI-STI-ASO पुर्व परिक्षेचे आव्हान म्हणजे एक तासांत पेपर सोडविणे होय. इथुन पुढे त्या वेळेचे व्यवस्थापन करण्यावर विशेष भर दिला पाहिजे. एक महिनाभर 11 ते 12 या परिक्षेच्या वेळेतच दररोज एक सराव प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करावा. 30 दिवसांत 30  चुका(वेळ, मानसिकता, रणनीती संबंधित) सापडल्या आणि त्यावर तयारी केली तरी प्रत्यक्ष पेपर ला प्रभावी वेळ व्यवस्थापन होईल

प्रश्नपत्रिका सराव- उपलब्ध सर्व संस्थांच्या सराव प्रश्नपत्रिका सोडवुन घेणे चूकलेले आणि न सोडवलेले प्रश्नांच्या विश्लेषणा आधारे कच्चे घटक दररोजच्या दररोज पक्के करत रहा.

परिक्षेची तयारी – दररोजचा अर्धा तास परिक्षा रणनीती, नियोजन, मानसिकता आणि आपला असल्यास यांच्या अवलोकनासाठी द्यायला हवा जेणेकरून आपल्यातील कमतरता कमी होत जाऊन परिक्षेसाठी आपण सक्षम होत जाऊ.

राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये झालेल्या चुका आता सुधारण्याची संधी म्हणून या PSI-STI-ASO पुर्व परिक्षेकडे पाहिलं‌ पाहिजे आणि तशीही पुर्व वर्ग एक आणि दोन पदांसाठीची यावर्षीची एकमेव शेवटची संधी आहे

#बाकी_अभी नही‌ तो कभी नहीं.

Nitin Barhate UPSC MPSC

नितिन ब-हाटे
9867637685
(लेखक’लोकनीति IAS, मुंबई’ चे मुख्य समन्वयक असुन स्पर्धापरिक्षा मार्गदर्शक आहेत)

(विशेष आव्हाहन – MPSC तुन शिफारसपात्र उमेदवारांच्या तात्काळ नियुक्ती तसेच इतर समस्या इत्यादी प्रक्रियेसाठी आपापला अभ्यास सांभाळून भावी अधिकारी म्हणुन आपण सर्वांनी निदान समाज माध्यमातून जमेल तसा पाठिंबा पुर्वक सक्रिय सहभाग नोंदविला पाहिजे)

संदर्भासाठी इतर महत्त्वाचे –

“PSI-STI-ASO 2019 पुर्व परिक्षेची तयारी कशी करावी….?”

महापरिक्षेचे महाभारत, स्पर्धापरिक्षा विद्यार्थी हैराण | #भाग ६

मागच्या वर्षी प्रिलिम्स निघाली होती..यावर्षी ती पण नाही ?? मग हे वाचाच

“UPSC/MPSC देत असाल तर पुढील २० गोष्टी लक्षात ठेवा……”

“मी कोणत्या सरकारी परिक्षेची तयारी करु…?” UPSC/MPSC ?

Leave a Comment