हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल लोकांची जीवनशैली बदलल्यामुळे याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर देखील होताना दिसत आहे. बदलत्या खराब जीवनशैलीमुळे त्यांना अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये डायबिटीज, हार्ट अटॅक तसेच ऍसिडिटी सारख्या अनेक समस्या उद्भवतात. आजकाल लोकांना ऍसिडिटी होताना दिसत असते. काही लोकांच्या छातीत जळजळ होते तर काही लोकांच्या पोटात दुखते. म्हणजेच ऍसिडिटीचे वेगवेगळे प्रकार आहेत. परंतु तुम्ही घरगुती काही गोष्टींमध्ये बदल करून देखील तुमची ऍसिडिटी बंद करू शकता. आता कोणत्या गोष्टींमध्ये बदल केले पाहिजेत, हे आपण जाणून घेणार आहोत.
झोपण्याची पद्धत बदला
तुमच्या छातीत जळजळ होत असेल, तर छातीतील जळजळ कमी करण्यासाठी तुम्ही कसे झोपता हे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही जर उशी घेऊन डाव्या कुशीवर झोपलात तर ऍसिडिटी कमी होण्यास मदत होते. परंतु तुम्ही जर सरळ पाठीवर झोपला तर ऍसिडिटीचा त्रास वाढतो. त्याचप्रमाणे तुमची जर झोप अपुरी झाली असेल, तरीदेखील ऍसिडिटीचा त्रास वाढतो. ऍसिडिटीचा त्रास कमी होण्यासाठी योग्य प्रमाणात झोपणे गरजेचे असते. तसेच रात्री झोपण्याची आणि सकाळी उठण्याची वेळ एकच ठेवली पाहिजे. त्यानंतरच अवयवांचे कार्य सुरळीत चालते.
आहारावर लक्ष द्या
तुम्ही झोपण्यापूर्वी जास्त मसालेदार पदार्थ खाऊ नका. तसेच अति प्रमाणात देखील खाऊ नका. झोपण्यापूर्वी किमान तीन तास आधी तुम्ही रात्रीचे जेवण करा. यामुळे तुमच्या अन्नाचे पचन देखील चांगले होईल. आणि ऍसिडिटी वाढणार नाही. तुम्ही एकाच वेळी जास्त जेवण्यपेक्षा दिवसभरात थोडे थोडे जेव्हा. त्यामुळे त्रास होणार नाही. तसेच चॉकलेट, लिंबू, टोमॅटो यांसारख्या पदार्थाने ऍसिडिटी वाढते. त्यामुळे हे पदार्थ खाणे टाळा.
जीवनशैलीत बदल करा
आजकाल ऍसिडिटीचा त्रास होऊ लागला आहे. यासाठी तुम्ही नियमित व्यायाम करणे, मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी योगासने करणे खूप गरजेचे आहे. तुम्ही जर नियमितपणे शारीरिक व्यायाम केला, तर तुमच्या आरोग्य देखील चांगले राहील. त्यामुळे ऍसिडिटीचा त्रास होणार नाही. परंतु तुम्हाला जर ऍसिडिटीचा जास्त त्रास होत असेल, तर तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शन न घेता डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते. आणि त्यानुसार तुमचे जीवनशैलीत बदल करून औषधे घेणे गरजेचे असते. तर तुमची ऍसिडिटी कमी होईल.