Fake Lychees And Watermelons | बाजारामध्ये सध्या टरबूज आणि लिची या दोन फळांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. नुकतेच पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील ही फळे आता मोठ्या प्रमाणात विकली जात आहेत. आणि ही फळे सध्या स्वस्त दरात देखील मिळत असल्याने अनेक लोक ही फळे खातात. परंतु सध्या ही फळे खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते. बाजारांमध्ये सध्या बनावट फळांची त्याचप्रमाणे भेसळयुक्त फळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि हीच भेसळ सध्या लिची आणि टरबूज (Fake Lychees And Watermelons) या फळांमध्ये केली जात आहे. त्यामुळे ही फळे विकत घेताना काळजी घेणे खूप गरजेचे आहे.
बनावट लिची आणि टरबूज | Fake Lychees And Watermelons
ही फळे चुकीच्या पद्धतीने कृत्रिमरित्या पिकवली जातात. ही फळे चांगली आणि लाल दिसण्यासाठी यामध्ये वेगवेगळ्या हानिकारक रंगांचा वापर केला जातो. ज्यामुळे आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे टरबूज आतून लाल दिसावे यासाठी इंजेक्शन देऊन त्याचा रंग लाल केला जातो. त्यामध्ये रासायनिक रंग टाकला जातो. आणि गोड बनवण्यासाठी साखरेच्या पाकाचा देखील वापर केला जातो.
तसेच लीचीचा रंग लाल दिसावा आणि पिकलेली दिसावी त्यासाठी त्यावर लाल रंगाची फवारणी केली जाते. तसेच लीचीची चव गोड लागावी, यासाठी त्यावर लहान छिद्रे करून त्यात साखरेचा पाक सोडला जातो.
बनावट फळे ओळखायची कशी?
आता तुम्ही म्हणाल की, ही फळे पिकलेल्या फळांसारखी दिसत असतील, तर खरी आणि खोटी फळे ओळखायची कशी? यातील फरक जाणून घेण्यासाठी तुम्हाला कापसाचा वापर करायचा आहे. तुम्ही कापूस घ्या आणि लीचीवर घासा. त्यावर जर लाल रंग येत असेल, तर त्यावर लाल रंगाची फवारणी केलेली आहे असे समजा. त्याचप्रमाणे टरबूज विकत घेतल्यावर तो कापा आणि त्यावर कापूस फिरवा. जर त्या कापसाला लाल रंग लागला तर त्यामध्ये इंजेक्शनने लाल रंग टाकलेला असतो.
हे रंग रासायनिक असल्याने तुमच्या आरोग्यासाठी घातक असतात. दुकानदार केवळ त्यांच्या फळांची विक्री मोठ्या प्रमाणात व्हावी, यासाठी या पदार्थांचा वापर करत असतात. परंतु आपण वेळीच त्यापासून सावध होऊन आपल्या आरोग्याचे रक्षण करणे गरजेचे आहे.