हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| निवडणुका जवळ आल्या की आपल्या सर्वांना आठवते ते म्हणजे मतदान कार्ड. कारण की, मतदान कार्डशिवाय आपल्याला कोणत्याही निवडणुकीसाठी मतदान करता येत नाही. मात्र अशा काळातच तुमचे मतदान कार्ड हरवले असेल तर तुम्ही ते डुप्लीकेट पध्दतीने काढू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त पुढील स्टेप्स फॉलो करण्याची गरज आहे.
डुप्लीकेट मतदान कार्ड कसे काढावे?
1) सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याच्या वेबसाइटवर जावा. यानंतर EPIC-002 ची प्रत डाउनलोड करा.
2) EPIC-002 फॉर्म काळजीपूर्वक भरा. फॉर्म सोबत आवश्यक कागदपत्रे जोडा. तसेच डुप्लीकेट मतदान कार्ड का हवे आहे हे देखील नमूद करा.
3) मतदान कार्ड चोरीला गेले असेल तर एफआयआरची प्रतही जोडा.
4) यासोबत पासपोर्ट आकाराचा फोटो, पत्ता आणि ओळखीचा पुरावा जोडा.
5) पुढे सर्व कागदपत्रे स्थानिक निवडणूक अधिकाऱ्याकडे सबमिट करा.
6) यानंतर तुम्हाला एक संदर्भ क्रमांक दिला जाईल.
7) या क्रमांकाच्या आधारावर तुम्ही राज्य निवडणूक कार्यालयाच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही ओळखपत्र बनवून झाले आहे की नाही ते शोधू शकता.
8) तुम्ही हा अर्ज भरल्यानंतर अधिकाऱ्यांकडून जमा करण्यात आलेल्या माहितीची सर्व तपासणी केली जाईल. ही माहिती सर्व बरोबर असेल तर काही कालावधीतच तुम्हाला ओळखपत्र मिळून जाईल.