LIC Policy घेणाऱ्यांसाठी मोठी संधी, आता बंद झालेली आपली पॉलिसी पुन्हा कशी सुरु करायची ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सहसा, विमा पॉलिसी घेतल्यानंतर आपण सहामाही किंवा वार्षिक प्रीमियम भरतो. काही विमा कंपन्या आता दरमहा प्रीमियम जमा करण्याचा पर्यायही देत आहेत. तरीही आपण वेळेवर पैसे देऊ शकलो नाही तर आपली पॉलिसी बंद होते. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (एलआयसी) आता पॉलिसीधारकांना आपली खंडित झालेली पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची संधी देणार आहे. यासाठी एलआयसीकडून आजपासून एक स्पेशल रिव्हाइवल कॅम्पेन सुरू केले गेले आहे जे 9 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या मोहिमे अंतर्गत एलआयसीची बंद झालेली पॉलिसी पुन्हा सुरू केली जाऊ शकते.

विमा कंपनीने 10 ऑगस्ट ते 9 ऑक्टोबर या कालावधीत स्पेशल रिव्हाइवल कॅम्पेन सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्या अंतर्गत एलआयसीची बंद केलेली पॉलिसी पुन्हा सुरू केली जाऊ शकते. एलआयसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, या रिव्हाइवल कॅम्पेन अंतर्गत काही विशेष योजनांच्या पॉलिसीचे रिव्हाइवल केले जाऊ शकते, मात्र आपल्या प्रीमियमची डीफॉल्टची तारीख ही पाच वर्षांपेक्षा जास्त जुनी नसावी.

एलआयसीच्या निवेदनानुसार पॉलिसीधारकांना रिव्हाइवलसाठी लेट फी मध्ये 20 टक्के सूट मिळेल. आपल्याकडे अशा लोकांची कमतरता नाही आहे जे पॉलिसी सुरु ठेऊ शकत नाहीत, प्रीमियम भरु शकत नाहीत, अशा परिस्थितीत त्यांची पॉलिसी थांबते. यामध्ये लोकांचेच नुकसान आहे. आता एलआयसीने अशा लोकांना पुन्हा अशी संधी दिली आहे, 1 लाख ते 3 लाख रुपयांपर्यंतच्या लेट फीसाठी 25 टक्के सूट दिली जाईल. 3 लाखाहून अधिकच्या लेट फीवर 30 टक्के सूट दिली जाईल.

विमा प्रीमियम भरु न शकण्यानंतर पॉलिसी ग्रेस पीरियडमध्ये ट्रान्सफर केली जाते. साधारणत:, विमा कंपन्या सहामाही किंवा वार्षिक प्रीमियम भरण्यासाठी 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी देतात. मासिक प्रीमियमवर 15 दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळतो. या सवलतीच्या कालावधीत पॉलिसीधारक प्रीमियम भरुन आपली विमा पॉलिसी पुन्हा अ‍ॅक्टिव्ह करू शकतो. सवलतीच्या कालावधीतही आपण प्रीमियम भरु न शकल्यास पॉलिसी चुकते. अशा परिस्थितीत लाभधारकाला पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतरची विमा रक्कम मिळणार नाही. मात्र अतिरिक्त कालावधीत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, नॉमिनी व्यक्तीला पूर्ण पैसे मिळतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment