अशाप्रकारे सुरु करू शकतो आधार कार्ड सेंटर; ‘या’ ठिकाणी करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज-काल आधार कार्ड सेंटरचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालत आहे. अनेक शासकीय कागदपत्र काढण्यासाठी आधार कार्ड सेंटरला लोक भेट देत असतात. जर तुम्ही देखील आधार सेंटर सुरू करण्याचा विचार करत असा, तर आज आम्ही तुम्हाला आधार सेंटर कसे उभे करायचे? त्यासाठी किती खर्च येईल,? याबद्दलची सविस्तर माहिती आम्ही सांगणार आहोत.

आधार सेंटर चालू करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड सेंटरची फ्रेंचाईची विकत घ्यावी लागते. त्यासाठी तुम्हाला एक परीक्षा देखील द्यावी लागते. ही परीक्षा पास झाल्यानंतरच तुम्हाला आधार सेंटर चालू करता येईल. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून ही परीक्षा आयोजित केली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला आधार सर्विस सेंटर सुरू करण्यासाठी लायसन देण्यात येते. याद्वारे तुम्हाला आधार एनरोलमेंट आणि बायोमेट्रिक पडताळणी करण्याची मान्यता मिळते.

या स्टेप्स करा फॉलो

  • सर्वात आधी तुम्हाला https://uidai.nseitexams.com/UIDAI/LoginAction_input.action या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर Create New User या बटणावरवर क्लिक करा. तिथं तुम्हाला कोड शेअर करण्यास सांगितलं जाईल.
  • Share Code साठी https://resident.uidai.gov.in/offline-kyc या लिंकवर जाऊन ऑफलाइन ई-आधार डाऊनलोड करा.
  • त्यानंतर तुम्हाला XML File आणि Share Code मिळेल.
  • त्यानंतर अर्ज दाखल करण्याची माहिती तुम्हाला त्या फॉर्ममध्ये भरावी लागेल.
  • नंतर तुमचा फोन नंबर ईमेल आयडी आणि पासवर्ड येईल.
  • तुम्ही युजर आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातून आधार टेस्टिंग अँड सर्टिफिकेशन या पोर्टलवर लॉगिन करा.
  • त्यानंतर एक फॉर्म येतो फॉर्म भरा आणि त्यानंतर तुमचा फोटो आणि तुमची डिजिटल सही अपलोड करा.
  • नंतर Proceed to submit form पर्यायवर क्लिक करा. शेवटी तुम्हाला शुल्क भरावं लागेल.
  • सेंटर बुक करण्याची प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला दोन दिवस वाट पाहावी लागेल.
  • त्यानंतर तुम्ही त्या वेबसाईटला लॉग इन करा आणि बुक सेंटर या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्ही तुमच्या जवळचं कोणतेही सेंटर निवडा आणि परीक्षेची वेळ आणि तारीख निवडा.
  • ऍडमिट कार्ड डाउनलोड करा आणि ठरलेल्या दिवशी परीक्षेच्या सेंटरवर जा.

पेपर पास झाल्यावर काय करायचं?

तुम्ही ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर तुम्हाला आधार कार्ड सेंटर सुरू करण्याची परवानगी मिळते. आणि आधार कार्ड संबंधित कामकाज सुरू होते. ही फ्रेंचायजी तुम्हाला मोफत मिळते. मात्र सेंटरचा सेटअप उभा करण्यासाठी तुम्हाला इतर गोष्टी स्वतः कराव्या लागेल. जसं की तुमचे असणारे ऑफिस, संगणक, इंटरनेट या सगळ्याची व्यवस्था तुम्हाला करावी लागेल.