”UPSC/MPSC साठी भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास कसा करायचा……..??”

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीती, भाग 20 | नितिन बऱ्हाटे

विनापगारी घरकाम करणाऱ्या व्यक्तीचं योगदान  GDP मध्ये ग्राह्य धरण्याचे प्रयत्न व्हावे, प्रत्यक्ष लाभ हस्तांतरणामुळे सामान्याचा आर्थिक भार कमी करणे, विकासाच्या निर्देशांकांमध्ये व्यक्तीचा “आनंद” ग्राह्य धरला जाणे, आरोग्याचे मोजमाप करताना उपासमारी सकट छुपी उपासमारीही(Hidden Hunger) शोधली जावी, प्रत्येक बेरोजगाराला समाजिक दायित्व म्हणुन समान मुलभुत उत्पन्न(UBI) देण्याचं शासनावर आर्थिक दायित्व असावं या अपेक्षा फक्त आर्थिक महत्वकांक्षेतुनच शक्य होतील त्यासाठी अर्थशास्त्राचा सविस्तर अभ्यास आवश्यक आहे

सदर लेखात आपण स्पर्धापरिक्षांसाठी विचारल्या जाणाऱ्या “भारतीय अर्थव्यवस्था आणि सामाजिक विकास” या घटकाचा‌ अभ्यास काय करायचा??? कसा करायचा…?? आणि कशातुन करायचा हे पाहु.

उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग या चार आर्थिक व्यवहारांशी संबंधित असलेल्या संस्था ,संघटना यांच्या एकत्रीकरणातुन जी व्यवस्था निर्माण होते तिला “अर्थव्यवस्था” असे म्हणतात

अर्थशास्त्र संबंधित सर्व प्रश्न चालु घडामोडीच्या आधारे संकल्पनात्मक समज तपासणारे असतात, राष्ट्रीय मोजणीच्या सर्व संक्लपना स्पष्ट करुन घ्याव्यात,अर्थशास्त्राच्या मुळ संकल्पना स्पष्ट करुन घेतल्यावर चालु घडामोडी शी त्यांचा संबंध लावाता आला पाहिजे.  त्यासाठी आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेचेचा इतिहास माहीती पाहिजे, विशेषतः स्वातंत्र्योत्तर अर्थव्यवस्थेचा प्रवास, हरित क्रांती, औद्योगिक क्रांती, पंचवार्षिक योजना, नियोजन आयोगा पासुन नीती आयोग पर्यंत ची अर्थ उभारणी ते अर्थ नियोजनाचे धोरणबदल समजुन घेणे, आपण स्विकारलेली मिश्र अर्थव्यवस्था प्रणाली, उ-खा-जा धोरण, प्राथमिक, द्वितीय व तृतीय क्षेत्रामधील उतार चढाव असलेली अर्थव्यवस्था अतिप्रचंड ‌लोकसंख्या, तीचा अर्थव्यवस्थेवरील प्रभाव आणि परिणाम समजुन घेतला पाहिजे त्यासाठी केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक आणि इतर‌ वित्तीय संस्था यांनी घेतलेले निर्णय आणि त्यांचा झालेला रोजगार व दारिद्र्य या घटकांवर झालेला परिणाम समजुन घेणे आवश्यक आहे, तो समजुन घेण्यासाठीचे  मानवी विकास निर्देशांक(HDI) सारखे विविध निर्देशांक आणि त्यांचे निकष समजुन घ्यावे लागतील. भारतीय अर्थव्यवस्था आणि जागतिक अर्थव्यवस्था यांचा परस्परसंबंध समजुन ‌घेतला तर राष्ट्रासाठी ची आर्थिक प्रगतीची शाश्वत उद्दिष्टे लक्षात येतील.

UPSC/MPSC  पुर्व परिक्षा- Economic and social development – sustainable development, poverty, inclusion, demographics, social sector initiatives, etc. MPSC पुर्व परिक्षेत  अर्थव्यवस्था आणि सामाजिक विकास संबंधी प्रश्र्न असतात, शाश्वत विकास, लोकसंख्या, दारिद्र्य, सर्वसमावेशन, विविध धोरणे, शासकीय योजना, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी घटकांवर प्रत्येकी एक/दोन प्रश्र्न असतातच.
UPSC मध्ये मागील तीन वर्षांपासून 1/4 प्रश्र्न म्हणजे  25% प्रश्न अर्थव्यवस्था आणि योजना वर विचारलेले आहेत.  MPSC पुर्व परिक्षेत पुर्व अभ्यासक्रम आधारीतच तथ्य आणि आर्थिक संकल्पनात्मक आकलन तपासणारे प्रश्र्न विचारले जातात.

विशेष महत्त्वाचे – MPSC पुर्व 2019 साठी लोकसंख्या, दारिद्र्य, बेराजगारी , सामाजिक समावेशन, पंचवार्षिक योजना, 1991 सुधारणा, निर्देशांक, RBI, शहरीकरण, महिला बालकल्याण योजना, महाराष्ट्र शासनाच्या योजना, शाश्वत अर्थव्यवस्था आणि विविध धोरणे इत्यादी घटकांसंबंधी विस्तृत तयारी केल्यास उत्तम.

MPSC मुख्य – भारतीय अर्थव्यवस्था व नियोजन, नागरी व ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास, उद्योग गरजा, सहकार, आर्थिक सुधारणा, आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवली चळवळ, गरिबीचे निर्देशांकन व अंदाज, रोजगार निर्धारणाचे घटक, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, विकास व कृषी यांचे अर्थशास्त्र (समष्टि अर्थशास्त्र, सार्वजनिक वित्तव्यवस्था आणि वित्तीय संस्था), वाढ, विकास व आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, भारतीय कृषीव्यवस्था, ग्राम विकास व सहकार, ग्रामीण कर्जबाजारीपणा, कृषी पतवारीची समस्या, अन्न व पोषण आहार, भारतीय उद्योग पायाभूत सुविधा व सेवा क्षेत्र इत्यादी.
MPSC मुख्य परिक्षेला अर्थशास्त्र या विषयांचे ‌वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा सराव विशेष ‌आवश्यक आहे कारण या प्रश्र्नांची उत्तरे संकल्पनेच्या आकलन आणि तथ्यात्मक जोडणी अवलंबून असतात.

UPSC मुख्य-
भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजनासंबंधी मुद्दे, साधनांचे एकत्रीकरण, वाढ, विकास आणि रोजगार
सर्वसामावेशशक वाढ आणि त्यासंबंधी मुद्दे, शासकीय अर्थसंकल्प, शेतीसंबंधी अर्थकारण, अनुदान, हमीभाव, सार्वजनिक वितरण प्रणाली, अन्न सुरक्षितता, पुरवठा साखळी नियोजन, उदारीकरणाचा अर्थव्यवस्थेवरील प्रभाव, औद्योगिक वाढीवरील प्रभाव, पायाभुत सुविधा , गुंतवणूक पध्दती.

UPSC मुख्य परिक्षेला अर्थशास्त्र चालु घडामोडी शी संबंधित प्रश्र्न मुख्य परिक्षेला विचारले जातात त्यामुळे अर्थशास्त्र चालु घडामोडी च्या जोडणीत अभ्यासने आवश्यक आहे तसेच UPSC मुख्य परिक्षेसाठी समकालीन आर्थिक पेच आणि मुद्दे विस्तृत विश्लेषण आणि विविध परिप्रेक्ष्यात तयार करुन ठेवले पाहिजेत. अर्थशास्त्र विषयाचा पेपर पुर्णतः समकालीन घडामोडीवर असतो.

MPSC पुर्व साठी रंजन कोळंबे सरांचे तर UPSC पुर्व साठी  NCERTS + SriRam IAS नोट्स (चालु घडामोडी सहित) अर्थशास्त्राची निकड भागवतात. तरीही आपापल्या आकलन आणि सोयीनुसार अभ्याससाहित्य निवडावे. Mrunal you tube व्हिडीओसही अर्थशास्त्रासाठी लोकप्रिय आहेत.

UPSC साठी केंद्रीय अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी अहवाल पुर्णत वाचुन घ्यावा, अर्थव्यवस्थेचे विस्तृत उपयोजन आणि संबंधित वर्षाची प्रगती लक्षात  येते. शासकीय दस्तावेज असल्याने भाषा ओघवती असते समजण्यास अडचण येत नाही, मुख्य परिक्षेच्या प्रभावी उत्तरांसाठी महत्त्वाचे मुद्दे मिळतात.

महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल MPSC मुख्य साठी निवडक वाचुन घ्यावा.

अर्थव्यवस्था अभ्यासाहित्य –

NCERTs – 9 to 12th
आर्थिक संकल्पना – गोविळकर book
Indian Economy – Ramesh Singh
Indian Economy – pratiyogita darpan
Indian Economy – Sri Ram IAS notes
भारतीय अर्थव्यवस्था – रंजन कोळंबे
भारतीय अर्थव्यवस्था भाग 1 – किरण देसले
भाग 2 विकास – किरण देसले
अद्ययावत अर्थसंकल्प, आर्थिक पाहणी अहवाल(भारत सरकार, महाराष्ट्र)
मासिक – योजना ,कुरुक्षेत्र, इकाॅनामिक पाॅलिटिकल वीकली(EPW)
India year Book

Other Online Sources – Mrunal.orgpib.nic.in

अॅडम स्मिथ म्हणतो “No society can surely be flourishing and happy, if which the far greater part of the members are poor and miserable”

भारतीय अर्थव्यवस्था समजुन घेण्यासाठी अर्थशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा आहे त्याशिवाय एक जिल्हाधिकारी म्हणुन एक जिल्हा एका उद्यमी सारखा संसाधनांचा योग्य विनिमय करुन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरीता तसेच नागरीकांना वित्तीय साक्षर करण्यासाठी आणि त्यांनी दिलेल्या कररुपी आर्थिक सहभागाचे न्यायिक व्यवस्थापन नागरिकांच्या (वंचित घटकांसहित) समृद्धीसाठी करण्याकरिता अर्थभान येणे आवश्यक आहे, कारण भावी अधिकारी म्हणुन आपल्या समाजाचे “आर्थिक दायित्व” आपल्यावरच येणार आहे

बाकी_A diversified economy is a central pillar of economic security.

Nitin Barhate UPSC MPSC

नितिन ब-हाटे
9867637685
(लेखक’लोकनीति IAS, मुंबई’ चे मुख्य समन्वयक असुन स्पर्धापरिक्षा मार्गदर्शक आहेत)

इतर महत्वाचे –

भाग १ – स्पर्धापरिक्षेची तोंड ओळख

भाग २ – UPSC, MPSC परीक्षांचा अभ्यास कधी सुरू करावा

भाग 3 – स्पर्धा परिक्षां‌च्या अभ्यासाचा आवाका, त्रिसुत्री आणि रणनीतीची चौकट

भाग ४ – तर मग UPSC /MPSC करू नका ???

भाग ५ – UPSC/MPSC का करावी ???

भाग ६ – महापरिक्षेचे महाभारत, स्पर्धापरिक्षा विद्यार्थी हैराण

भाग ७ – मागच्या वर्षी प्रिलिम्स निघाली होती..यावर्षी ती पण नाही ?? मग हे वाचाच

भाग ८ – निबंधाचे तत्वज्ञान UPSC 2018

भाग 9 – कनेक्टिंग द डाॅटस् …UPSC Mains 2018

“मी कोणत्या सरकारी परिक्षेची तयारी करु…?” UPSC/MPSC ?