तुम्हालाही आधार कार्डवरील फोटोची लाज वाटते का? अशाप्रकारे करा नवीन फोटो अपडेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी एक महत्त्वाचे असे ओळखपत्र आहे. कोणत्याही सरकारी कामासाठी तसेच वैयक्तिक करण्यासाठी देखील आधार कार्ड खूप गरजेचे आहे. आधार कार्ड हे तुमचे प्रमुख ओळखपत्र आहे. परंतु जर याच आधार कार्डवर तुमची कोणतीही माहिती चुकीची असेल, तर त्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आधार कार्डवर तुमचा फोटो, नाव, पत्ता, जन्मतारीख या डिटेल्स खूप महत्त्वाच्या आहे आणि ही माहिती आता अपडेट करणे खूप सोपे झाले आहे. तुम्ही तुम्हाला पाहिजे ती माहिती बदलण्यासाठी तुमच्या जवळील आधार नोंदणी केंद्रावर जाऊन या गोष्टी अपडेट करू.

एक कोणत्याही व्यक्तीच्या आधार कार्डवर त्याचे नाव, पत्ता, वय, लिंग, फोन नंबर, ईमेल आयडी यांसारखे माहिती असते. परंतु अनेक वेळा आपल्या आधार कार्ड घेतले की, आपल्याला आपल्या फोटोची लाज वाटते. कारण या फोटो आधार कार्डवरील फोटो लहानपणीचा फोटो असतो. परंतु जर तुम्हाला देखील तुमच्या आधार कार्ड वरील फोटोची लाज वाटत असेल, तर तुम्ही हा फोटो बदलून घेऊ शकता. आधार कार्ड वरील हा फोटो बदलण्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट लागत नाही. यासाठी एक छोटीशी प्रक्रिया तुम्हाला पार करावी लागेल. ज्यामुळे तुम्ही तुमच्या आधार कार्ड वरील फोटो सहज बदलू शकता.

तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरील नाव, पत्ता, वय, लिंग, फोन नंबर, ईमेल आयडी अपडेट करायचा असेल, तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हे काम करू शकता. परंतु जर तुम्हाला तुमच्या फिंगरप्रिंट किंवा फोटो बदलायचा असेल, तर तुम्ही आधार नोंदणी केंद्रावर जाऊन करू शकता. जिथे तुम्हाला काही शुल्क द्यावे लागेल. आणि नवीन आधार कार्ड हे 30 ते 90 दिवसाच्या आत तुमच्या पत्त्यावर पाठवले जाईल. आता फोटो बदलण्यासाठी काय करावे लागते? याची स्टेप बाय स्टेप माहिती आपण घालून घेणार आहोत.

आधार कार्डवरील फोटो कसा बदलायचा ?

  • आधार कार्डवरील फोटो बदलण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी UIDAI यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर माय आधार या विभागात एन्ट्रॉलमेंट अँड अपडेट कॉर्नर वर क्लिक करून हा फॉर्म डाउनलोड करावा लागेल.
  • त्यानंतर तुम्ही त्या फॉर्मची प्रिंट घ्या आणि तुमची संपूर्ण माहिती करा आणि तो सबमिट करण्यासाठी जवळच्या आधार केंद्रावर जा.
  • तिथे गेल्यावर संपूर्ण फॉर्म करताना केली जाईल आणि तुमचा तुम्हाला पाहिजे तसा नवीन फोटो क्लिक केला जाईल.
  • त्यानंतर तुम्हाला 100 रुपये एवढी फी द्यावी लागेल.
  • त्यानंतर तुमच्या आधार कार्ड वरील फोटो अपडेट केला जाईल.