टीम, HELLO महाराष्ट्र । पूर्वी डोळ्याला नंबर लागला तर चष्म्याशिवाय काही पर्याय नव्हता . पण काळ बदलला तसा लोक लेन्सेसला पसंती द्यायला लागले . डोळ्यावर चष्मा संभाळण्यापेक्षा लेन्स सोयीस्कर वाटू लागले . वापरायला सोपे आणि किंमतही खिशाला परवडणारी असल्याने लेन्सची लोकप्रियता वाढली . मग हळूहळू त्यात कलर्ड लेन्सने एन्ट्री केली . आता डोळ्याला नंबर नसेन तरी डोळ्याचा रंग बदलण्याच्या आकर्षणाने अनेक जण लेन्स वापरतात . लेंन्सने डोळ्यांचे सौंदर्य नक्कीच खुलून येते, परंतु या लेंन्स लावताना डोळ्यांची आणि लेंन्सचीही विशेष काळजी घ्यावी लागते. प्रखर ऊन , धूळ आणि मेकअपने देखील डोळ्यांना इजा होऊ शकते. त्यासाठी लेंन्स लावताना आणि काढताना डोळ्यांची कशी काळजी घ्यायची हे पाहुयात.
१. डोळ्यांना इन्फेक्शन झाले असल्यास लेंन्सेसचा वापर टाळा –
निरोगी डोळ्यांवरच लेंन्स लावावेत .
२. हात स्वच्छ करा –
लेंन्स लावण्यापूर्वी हात नेहमी साबणाने स्वच्छ धुवा . त्यानंतर हात व्यवस्थित कोरडे करून घ्या .
हात कोरडे करण्यासाठी तंतुमय कापडाचा वापर करू नका त्याने कापसाचे तंतू हातावर राहीलेच तर हे तंतू लेंन्सला चिटकून डोळ्याना इजा करू शकतात .
३. मेकअप पूर्वी लेंन्स लावा-
मेकअप केल्यानंतर लेंन्स लावले तर मेकअपचे केमिकल्स डोळ्यात जाऊ शकतात . त्यामुळे लेंन्स आधी सेट करून मग मेकअपला सुरुवात करावी.
४. मेकअप काढण्यापूर्वी लेंन्स काढा –
मेकअप काढण्यापूर्वी स्वच्छ हाताने लेंन्स काढून घ्या . त्यांना लेंन्स होल्डर मध्ये नवीन सोल्यूशनमध्ये बुडवून ठेवा .त्यामुळे लेंन्स देखील स्वच्छ आणि सुरक्षित राहतील.