PF मधील पैसे ऑनलाईन कसे काढायचे; जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या साथीचा प्रसार रोखण्यासाठी सध्या देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनमध्ये भासणारी पैशांची कमतरता दूर करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) ने ऑनलाइन आधार-बेस्ड फॅसिलिटीचा उपयोग करुन आपल्या रिटायरमेंटच्या बचतीतून पैसे काढण्यास परवानगी देत आहेत. यासाठी सदस्य ,ईपीएफओच्या,पोर्टलवर ऑनलाईन दावा करू शकतात. -https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/

यासाठीच्या अटी
ईपीएफओच्या इंटिग्रेटेड पोर्टलचा वापर करून ऑनलाईन पैसे काढण्यासाठी सदस्याकडे एक्टिविडेट UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) आणि ईपीएफओ खात्यास त्याच्या बँक अकाउंटचे डिटेल आणि आधार लिंक असणे आवश्यक आहे. तसेच, कंपनीबरोबर ई-केवायसी अप्रूड आणि वेरिफाइड केलेले सणे आवश्यक आहे.

कंपनी कडून अप्रूव्हल 
लॉग इन केल्यानंतर सदस्याने ‘Manage’ वर क्लिक करावे आणि नंतर केवायसीसाठी आधार नंबर आणि बँक अकाउंट डिटेल भरावा. नोकरी देणारी कंपनी किंवा संस्थेद्वारे यासाठीचे अप्रूव्हल मिळणे आवश्यक आहे आणि नोकरी सोडल्यानंतर कमीतकमी दोन महिन्यांनंतर ऑनलाइन या क्लेमवर दावा केला जाऊ शकतो.

काय आहे क्लेम प्रक्रिया
पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर, मेन पेजवरील “ऑनलाइन सर्विसेस” या टॅबवर क्लिक करा आणि नंतर ‘क्लेम’ फॉर्म निवडा, जो की एक संयुक्त फॉर्म क्रमांक, 31, 19, 10 सी आणि 10 D आहे. सदस्यासाठी माहिती पेजवर अपडेट केली जाईल. त्यानंतर रजिस्टर्ड बँक अकाउंट क्रमांकाचे शेवटचे चार अंक टाकणे आवश्यक आहे. बँक अकाउंटच्या व्हेरिफिकेशनसाठी पुढे जाण्यासाठी ‘सर्टिफिकेट ऑफ अंडरटेकिंग’ या पॉप अपची आवश्यकता असते.

एकदा व्हेरिफिकेशन झाल्यानंतर सदस्य ‘क्लेम साठी पुढे चला’ वर क्लिक करू शकतात. त्यानंतर इच्छित असलेले पैसे (desired withdrawal) काढण्याचा पर्याय निवडावा आणि रक्कम अपडेट करावी. चेकची स्कॅन केलेली कॉपी अपलोड करावी लागेल तसेच सदस्याला तिथे आपल्या पत्त्याचा उल्लेखही करावा लागेल. या व्यवहाराला प्रमाणित करण्यासाठी सदस्याच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी पाठविला जाईल. याची पडताळणी झाल्यानंतरच, दावा सादर करावा लागेल.

कोविड १९ ईपीएफ पैसे काढणे
ईपीएफओने कोविड -१९ च्या संकटामुळे उद्भवलेल्या या आर्थिक आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सदस्याच्या खात्यातून अंशतः पैसे काढण्याची परवानगी देखील दिलेली आहे. तीन महिन्यांच्या बेसिक आणि महागाई भत्ता (डीए) किंवा खात्यात ७५ % क्रेडिट बॅलन्स यापैकी जी रक्कम कमी असेल ती काढू शकाल. यासाठी ‘कोविड -१९ पँडेमिक’ हा पर्याय निवडणे आवश्यक आहे आणि त्यानंतर ‘पीएफ अ‍ॅडव्हान्स’ क्लेमवर क्लिक करणे आवश्यक आहे.

क्लेम स्टेटस
ऑनलाईन सेवा टॅब अंतर्गत सदस्य चेक क्लॅम स्टेटसद्वारे पोर्टलवर आपल्या क्लेमची स्थिती तपासू शकतात. ईपीएफमधून पैसे काढणे याचे फायदे आणि तोटे दोन्हीही आहेत. हे देखील लक्षात घेण्याची आवश्यकता आहे कारण ते आकर्षक कर मुक्त, गॅरेंटेड रिटन्स देते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment