हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गणेशोत्सव हा आपल्या देशातील सर्वात लोकप्रिय सण मानला जातो. या काळात आपण आपल्या घरी गणरायाची मूर्ती आणतो, ढोल ताशांच्या गजरात गणेशाचे स्वागत केलं जाते. आणि ११ दिवस त्याची मनोभावे पूजा अर्चना केली जाते. अतिशय भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र गणेशाची पूजा कशी करावी? कोणते मात्र त्यावेळी म्हणावे हे तुम्हला माहित आहे का? नसेल तर आज आम्ही तुम्हाला याबाबत सविस्तर सांगतो.
यंदा गणेश स्थापनेची योग्य वेळ कोणती? Ganesh Chaturthi 2024
गणेश स्थापनेची योग्य वेळ कोणते हे जाणून घेणं सर्वात महत्वाचे आहे. तर आम्ही तुम्हाला सांगतो कि, ७ सप्टेंबर रोजी दुपारपासून बाप्पाची मूर्ती घरोघरी आणू शकता. त्याचा शुभ योग सकाळी 11:03 पासून सुरू होईल आणि दुपारी 01:34 पर्यंत राहील. याचा अर्थ 2024 मध्ये गणपतीची मूर्ती स्थापनेसाठी अडीच तास (150 मिनिटे) शुभ मुहूर्त आहे. त्याकाळात तुम्ही गणरायाला घरी आणून त्याची स्थापना करू शकता.
गणपतीची पूजा कशी करावी?
गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी सकाळी उठून स्नान करावे. स्थापनेच्या वेळेनुसार बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करा. यानंतर पूजा सुरू करावी. गणरायाला पिवळे कपडे परिधान करा, त्याला सिंदूर आणि चंदनाचा तिलक लावा तसेच यानंतर गणेशाच्या चरणी फुले ठेवावीत. गणपतीला दररोज दुर्वा वाहाव्या. गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर बसून गणेश चालिसा आणि त्याचे वैदिक मंत्र म्हणा. यानंतर गणरायाची आरती म्हणून आणि नैवेद्य म्हणून गणपती बाप्पाला मोदक प्रसाद म्हणून द्यावा.
गणपतीचा आवडता नैवेद्य कोणता?
गणरायाला तांदूळ आणि गव्हाच्या पिठाचे लाडू आणि मोदक, गूळ आणि खोबरे यांनी भरलेले गोड पकोडे खूप आवडतात. तसेच त्याला मोदक सुद्धा आवडतात. त्यामुळे गणेशोत्वसाच्या काळात गणपती बाप्पाला २१ मोदक खाऊ घाला. तसेच तुमचा प्रसाद हा शक्यतो गोड़ पदार्थ असावा.