रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा शुभ दिवस मेष ते मीन राशीसाठी कसा ठरेल? जाणून घ्या

Ramlalla's Pran Pratistha
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज 2024 सालातील सर्वात महत्त्वाची आणि शुभ तारीख आहे. कारण आज 22 जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (Ramlala Pran Pratishtha) करण्यात येणार आहे. तसेच अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराचा (Ram Mandir) भव्य लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या भव्य सोहळ्यासाठी आजची 22 जानेवारी तारीख अनेक नक्षत्र योग, संयोग जुळून आल्यामुळे ठरवण्यात आली आहे. त्यामुळे आजचा शुभ दिवस अनेक राशींवर सकारात्मक परिणाम करणारा ठरणार आहे. चला मग पाहूया 22 जानेवारी तारीख राशींसाठी (Rashi Bhavishya) कशी असेल.

मेष रास – मृगाशिरा नक्षत्रामुळे मेष राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. आजच्या दिवशी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वादशी आहे. तसेच, आजच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी, अमृत सिद्धी आणि रवि असे योग देखील जुळून येणार आहेत. त्यामुळे आजचा हा दिवस मेष राशीसाठी अत्यंत शुभ असेल.

वृषभ रास – आजच्या दिवशी वृषभ राशीतील व्यक्तींना यश संपादन होईल. तसेच नशिबाची पूर्ण साथ मिळून अनेक चांगले कार्य पार पडतील. आजच्या दिवशी या राशीतील लोकांना नोकरीची संधी चालून येईल. तसेच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद टिकून राहील..

मिथून रास या राशीतील लोकांच्या हातून आज पुण्याचे कामे होतील. तसेच ते आध्यात्मिक मार्गाकडे देखील मिळू शकतात. आजच्या दिवशी मिथुन राशीतील लोकांना यश संपादन होईल. तसेच नोकरीमध्ये बढती मिळेल.

कर्क रास – 22 जानेवारी रोजी अनेक शुभ योग जुळून आल्यामुळे कर्क राशीतील लोकांच्या आयुष्यातील अनेक समस्या दूर होतील. तसेच वैवाहिक जीवन सुखी होईल. एखादा व्यवसाय करत असाल तर त्यामध्ये देखील यश मिळेल. आयुष्यात बऱ्याच सकारात्मक गोष्टी घडण्यास सुरुवात होईल.

सिंह रास – या राशीतील व्यक्तींना त्यांच्या मुलांकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तसेच बिघडलेले नातेसंबंध सुधरतील. कौटुंबिक जीवनाला आनंदाने सुरुवात होईल. नोकरी वा व्यवसायामध्ये चांगली संधी चालून येईल.

कन्या रास – या राशीतील लोकांना अनेक वेगवेगळ्या सुविधांचा लाभ घेता येईल. तसेच यश स्वतःहून चालून येईल. आजच्या दिवशी हे लोक नवीन वाहने किंवा घर खरेदी करू शकतात. तसेच प्रकृती खालवलेली असेल तर त्यामध्ये देखील सुधारणा होऊ शकते. आजच्या दिवशी लांबचा प्रवास देखील घडण्याची शक्यता आहे.

तूळ रास – आजच्या शुभ दिवशी या राशीतील लोकांना अनेक चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. तसेच करिअरमध्ये आणि नोकरीच्या ठिकाणी सकारात्मक बदल घडून येतील. हा दिवस या राशीतील लोकांसाठी भाग्यशाली ठरू शकतो.

वृश्चिक रास – या राशीतील लोकांचा आज बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे. तसेच घरामध्ये सुख समृद्धी नांदेल . वैयक्तिक आयुष्यामध्ये देखील अनेक चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. आजच्या दिवशी प्रमोशन मिळण्याची देखील शक्यता आहे.

धनु रास – 22 जानेवारी रोजी शुभ योग जुळून आल्यामुळे धनु राशीतील लोकांच्या आयुष्यामध्ये प्रेम संबंध चांगले होतील. तसेच नवीन माणसे आयुष्यात येतील. अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. दिवस शुभ आणि आनंदी जाईल.

मकर रास – आजचा दिवस मकर राशीतील लोकांसाठी अत्यंत भाग्यशाली ठरेल. ग्रहांचा योग जुळून आल्यामुळे आर्थिक पातळी उंचावेल, तसेच जुन्या समस्या दूर होतील. नोकरीच्या ठिकाणी देखील अनेक सकारात्मक गोष्टी घडून येतील.

कुंभ रास – कुंभ राशीतील लोकांसाठी देखील आजचा दिवस शुभ ठरेल. अनेक गोष्टींमध्ये यश संपादन होईल. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस शुभ ठरेल. आरोग्य ही चांगले राहील. अनेक नवीन गोष्टी भेटवस्तू आजच्या दिवशी (Rashi Bhavishya) मिळू शकतात. घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

मीन रास 22 जानेवारी रोजी ग्रहांचे योग जुळून आल्यामुळे नशिबाची साथ मिळेल. करिअरमध्ये प्रगती होईल. तसेच व्यवसायामध्ये नफा मिळू शकतो. आजच्या दिवशी एखाद्या नवीन वाहने घेऊ शकतात. वैवाहिक जीवन सुखी होईल.