Saturday, March 25, 2023

व्हाट्सएपचे स्टेटस पाहिलंय की नाही हे समोरच्याला समजणार नाही ; वापरा ही जबरदस्त ट्रिक

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अँड्रॉइड मोबाईल मधील व्हाट्सएप हे अप्लिकेशन जगभरात सर्वजण वापरत असतात. मनोरंजन तसेच संदेश पाठवण्यासाठी हे महत्वाचे अप्लिकेशन आहे. लोक या फिचरचा वापर त्यांच्या भावना शेअर करण्यासाठी करु लागले आहेत. फोटो, व्हिडीओ किंवा टेक्स्टच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅप युजर्स त्यांच्या भानवा व्यक्त करत असतात. स्टेटस अपलोड केल्यानंतर पुढील 24 तास हे स्टेटस तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर दिसतं. त्यानंतर आपोआप रिमूव्ह होतं.

अनेकदा असं होतं की आपल्याला एखाद्या युजरचं स्टेटस पाहायचं असतं, परंतु त्या व्यक्तीला कळू द्यायचं नसतं की, आपण तिचं स्टेटस पाहिलंय. अनेकांना तसं करता येत नाही. परंतु आम्ही तुम्हाला एक अशी ट्रिक सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही कोणाचंही स्टेटस पाहू शकता आणि त्या व्यक्तीला कळणारही नाही, की आपण तिचं स्टेटस पाहिलंय.

- Advertisement -

तुम्हाला लोकांचं स्टेटस पाहायचं आहे, परंतु लोकांना हे कळू द्यायचं नसेल तर तुम्हाला WhatsApp वरील फिचर Read receipts टर्न ऑफ करावं लागेल. Read receipts बंद करण्यासाठी WhatsApp प्रायव्हसी सेटिंग्समध्ये जा आणि तिथे Read receipt चा टॉगल दिसेल तो बंद करा. असं केल्यानंतर तुम्ही कोणाचंही स्टेटस पाहिल्यानंतर त्या व्यक्तीच्या स्टेटस व्ह्यू लिस्टमध्ये तुमचं नाव दिसणार नाही. त्यामुळे त्या व्यक्तीला कळणारच नाही की, तुम्ही तिचं स्टेटस पाहिलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’