हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात अशक्य वाटणाऱ्या अनेक आश्चर्यकारक गोष्टी तयार केल्या गेल्या आहेत. ज्या पाहून स्तब्धच व्हायला होते. भारतातही अशा अनेक गोष्टी निर्माण केल्या गेल्या आहेत आणि होत आहेत. जर आपण भारतीय अभियांत्रिकीच्या सर्वोत्कृष्ट नमुन्यांबाबत चर्चा केली तर हावडा ब्रिजचे नाव निश्चितच समोर येते.
82 वर्षांचा ‘हावडा ब्रिज’ –
1945 मध्ये बांधलेल्या या पुलाला 82 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांचा भाग असलेल्या या पुलाने हावडा आणि कलकत्तामध्ये अनेक बदल होताना पाहिले आहेत. 1965 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्या नावावरून या पुलाचे नाव रवींद्र सेतू असे ठेवण्यात आले. या हावडा ब्रिजशी संबंधित अनेक मजेशीर गोष्टी आहेत, ज्याची आज आपण माहिती घेणार आहोत.
जाणून घ्या पुलाचा इतिहास-
या पुलाचा इतिहास जुना आहे कारण जिथे आजचा हावडा ब्रिज आहे, तिथे एक जुना पूल होता ज्याला बंगाली लोकं ‘पुरोनो ब्रिज’ म्हणत. हा पूल बांधण्याची सुरुवात 17 ऑक्टोबर 1874 रोजी सुरू झाली होती. रेल्वेचे मुख्य अभियंता ब्रॅडफोर्ड लेस्ली यांनी त्याचे डिझाइन केले होते. हा पूल फक्त 25 वर्षांसाठीच बांधायचा होता मात्र तो तब्बल 74 वर्षे तसाच होता.
हावडा ब्रिजचे मधोमध दोन भाग होत असल्याचे अनेक वेळा ऐकले आहे. खरे तर ते या जुन्या पुलाशी संबंधित होते. जेव्हा कधी एखादे जहाज किंवा बोट तेथून जात असत तेव्हा हा पूल मधूनच उघडला जायचा. त्या काळात बोट येण्याच्या वेळा ठरलेल्या असत आणि त्यानुसारच लोकंही तिथून जात असत. 1906 पासून हा पूल रात्रीच्या वेळी जल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र पुढे जाणून 1945 मध्ये हा पूल पाडण्यात आला कारण त्यानंतर तिथे नवीन पूल बांधण्यात येणार होता.
नवीन ब्रिजचे वैशिष्ट्य –
तर मग आता असा प्रश्न पडतो की, या नवीन पूलमध्ये अशी काय खास गोष्ट आहे जी त्याला एकमेवाद्वितीय बनवते. तर हे लक्षात असू द्या कि, या नवीन या पुलासाठी एकही नट-बोल्ट वापरण्यात आलेला नाही. धातूंनी बनलेल्या या पुलाचे धातू हे लोखंडी सळ्या वापरून एकमेकांना जोडले गेलेले आहेत. त्यात नट-बोल्ट असल्याचा दावा अनेकांनी केला असला तरी त्याची संख्या नगण्य आहे.
खांब नसलेला जगातील सहावा पूल –
एकही खांब नसलेला हा जगातील सहावा असा पूल आहे. हा पूल जगातील सर्वात वर्दळ असलेला पूल मानला जातो. या पुलावरून दररोज सुमारे 2 लाख लोकं पायी चालत जातात तर 1 लाख मोटारींची ये-जा असते. या पुलावरून 1993 पर्यंत ट्रामही धावत होत्या, मात्र तेथे होणाऱ्या गर्दीमुळे तेथील ट्रामची वाहतूक बंद करण्यात आली.
बॉम्ब स्फोट होऊनही पूल जसा चा तसा-
अनेक प्रकारची संकटे झेलत हा पूल आहे तसाच राहिला. जुना पूल एकदा वादळात अडकला होता तर एकदा यावर एक जहाज देखील आदळले होते. तसेच जपानने दुसऱ्या महायुद्धादरम्यान जेव्हा कोलकात्यात बॉम्ब टाकले होते, तेव्हा देखील या पुलाचे काहीच नुकसान झाले नाही कारण त्यावेळी त्यांचा मुख्य उद्देश किंग जॉर्ज डॉक नष्ट करणे हा होता, जो आता नेताजी सुभाष डॉक म्हणून ओळखला जातो. त्या काळात हा डॉक अमेरिकन सैन्याचा तात्पुरता तळ होता.