पुणे प्रतिनिधी | बहुप्रतीक्षित उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (HSC)चा आज निकाल लागणार आहे. शिक्षण बोर्डाच्या अधिकृत संकेत स्थळावर दुपारी १ वाजता हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. केंद्राच्या १२वीचा निकाल लागल्या नंतर राज्यातील १२ वीचा निकाल कधी लागणार हा प्रश्न सर्वत्र विचारला जात होता. ती प्रतीक्षा आता शिक्षण मंडळाने समाप्त केली आहे.
गतवर्षी १२ वीचा निकाल ३० मे रोजी लागला होता. या वेळी मात्र निकाल २ दिवस आधी लागला आहे. मागील वर्षी १० वीचा निकाल ८९.४१ टक्के एवढा होता तर १२ वी चा निकाल८८.४१ टक्के एवढा लागला होता.
१२ वीच्या निकाला पाठोपाठ १० वीचा निकाल देखील जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. मात्र या बाबत बोर्डाने अधिकृत तारीख अद्याप जाहीर केली नाही.
महत्वाच्या बातम्या
विखे-थोरात वादात नवी ठिणगी ; संगमनेरमध्ये फाडले सुजय विखेंचे बॅनर
लठ्ठपणावरून होत असलेल्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
परशाची आर्ची १२ वीला झाली पास ; मिळाले एवढे टक्के गुण
विधान परिषद पोटनिवडणूक : या नेत्याला भाजपने दिली उमेदवारी
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीची सत्ता येणार ; कॉंग्रेस आघाडीला मिळणार एवढ्या जागा