HSC Result 2024 | बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकतेच बारावीच्या निकालाची एकूण टक्केवारी जाहीर केलेली आहे. यावर्षी राज्यात 93.7% विद्यार्थी पास झालेले आहेत. त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारलेली आहे.
यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षा 1 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पार पडल्या. जवळपास 15 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी यावर्षी बारावीची परीक्षा दिली. यावर्षी बारावीचा निकाल हा 93.37% लागलेला आहे. यावर्षी मुलांपेक्षा 3.84 टक्क्यांनी जास्त मुली पास झालेल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात 2.12 टक्क्यांनी वाढ झालेली आहे.
यावर्षी महाराष्ट्र राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळात मार्फत फेब्रुवारी ते मार्च या महिन्यात बारावीची परीक्षा झाली. त्याचप्रमाणे बारावीचा निकाल आज दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे.
या वेबसाईटवर निकाल पाहा (HSC Result 2024)
mahresult.nic.in
http://hscresult.mkcl.org
www.mahahsscboard.in
https://result.digilocker.gov.in
http://results.targetpublications.org