हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता बारावीचा निकाल (HSC Result 2025) जाहीर केला आहे. बोर्डाने आज पत्रकार परीषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे. यंदा १२ वीचा निकाल 91.88 टक्के लागला असून दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. यावर्षी 94.58 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर मुलांची टक्केवारी हि 89.51 टक्के राहिली आहे. मुलांपेक्षा मुलींचा निकाल 5.07 टक्क्यांनी जास्त आहे.
कोणत्या विभागाचा निकाल किती टक्के? HSC Result 2025
विभागनिहाय निकाल जाणून घ्यायचा झाल्यास, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला आहे.. कोकणात 96.74 टक्के विद्यार्थी पास झालेत आहेत… तर
पुणे 91.32 टक्के, कोल्हापूर 93.64 टक्के, अमरावती 91.43 टक्के, छत्रपती संभाजीनगर 92.24 टक्के, नाशिक : 91.31 टक्के, लातूर 89.46 टक्के, नागपूर : 90.52 टक्के आणि मुंबई विभागाचा निकाल 92.93 टक्के लागला आहे.
इथे चेक करा तुमचा निकाल
निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे
mahresult.nic.in* mahahsscboard.in* hscresult.mkcl.org* results.digilocker.gov.in* results.targetpublications.org* results.navneet.com
निकाल पाहण्याची प्रक्रिया
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- HSC Examination Result 2025 या लिंकवर क्लिक करा.
- आपला रोल नंबर आणि आईचे नाव भरून सबमिट करा.
- स्क्रीनवर तुमचा निकाल दिसेल – त्याची प्रिंट काढून सेव्ह करा.
महाविद्यालयांमध्ये गुणपत्रिका उद्यापासूननिकालात विद्यार्थ्यांना विषयानुसार गुण दिसतील. मात्र, मूळ गुणपत्रिका उद्यापासून संबंधित महाविद्यालयांमध्ये उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यासाठी आपल्या शाळा/महाविद्यालयांशी संपर्क साधावा.पुनर्मूल्यांकन आणि पुरवणी परीक्षाजर विद्यार्थ्यांना आपल्या गुणांबाबत शंका असेल, तर काही आठवड्यांत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येईल. ज्या विद्यार्थ्यांचा निकाल अपूर्ण आहे किंवा अपयश आले आहे, त्यांच्यासाठी जुलै-ऑगस्ट २०२५ मध्ये पुरवणी परीक्षा होणार आहे. त्याचा निकाल सप्टेंबरमध्ये जाहीर केला जाईल.




