सातारा – कास रस्त्यांवर मानवी कवटी, हाडे जळलेल्या अवस्थेत सापडल्याने घातापाताची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा – कास रस्त्यावरील यवतेश्वर घाटात मानवी कवटी, हाडे तसेच जळालेल्या अवस्थेत चप्पल सापडल्याने परिसर हादरून गेला आहे. घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा सुरु केला असून घातापाताची शक्यता वर्तवली जात आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, यवतेश्वर घाटात मानवी हाडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याठिकाणी तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनाम्यास सुरूवात केली होती. यवतेश्वर घाटात निर्जन स्थळी कवटी, हाडे व इतर वस्तु पोलिसांना आढळून आल्या. दुपारी उशिरा पर्यंत पंचनामा सुरू असून परिसराची पाहणी पोलिसांकडून केली जात होती.

या परिसरात पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे प्रसिध्द असणाऱ्या ठिकाणीवर सापडलेल्या मानवी कवटी, हाडे व जळलेल्या चप्पलमुळे परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान, परिसरात अनेक ठिकाणी राख दिसत असून तेथे वणवा लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने पोलिस सर्व शक्यताचा तपासून पाहत आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होईल, असे सूत्रांनी सांगितले.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment