धर्माच्या सीमा ओलांडून बाबा पठाण यांनी केलं सविताच कन्यादान ; अहमदनगर मधील माणुसकी जपणारी घटना

अहमदनगर । तुम्ही फक्त विचार करा की  एक मुसलमान मामा आपल्या मानलेल्या हिंदू बहिणीच्या मुलींना कन्यादान करतोय. आणि त्यांना सासरी पाठवताना त्यांच्या गळ्यात पडून रडतोय. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे एका लग्नात हे धर्माच्या पलीकडचं नात पाहिला मिळालंय. सध्या सोशल मीडियावर या लग्नातील काही फोटो व्हायरल झाले आहेत.

शेवगाव तालुक्यातीक बोधेगाव येथे सविता भुसारी या शेतकरी कुटुंबातील असून, त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. नवऱ्याने सोडून दिल्याने त्या आईवडिलांकडे राहत आहेत. तिथेच त्यांनी त्यांच्या मुलींना मोठे केले. तसेच या महिलेला भाऊ नसल्याने त्यांनी घरासमोर राहणाऱ्या बाबा पठाण यांना गुरू भाऊ मानले आहे. बाबा पठाण यांनी देखील जाती-पातीच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्म दाखवत हिंदू मुलींचे मामा होऊन कन्यादान केले. एव्हढेचं नव्हे तर विवाहाचा अर्धा खर्च करुन मानलेल्या बहिणीच्या मुलींच्या सुखी संसाराला सुरुवात करुन दिलीय. हे फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले आहेत. तसंच अनेकजण या सामाजिक एकतेचे उदाहरण असलेल्या फोटोवर आपली भावना देखील व्यक्त करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’