जंगलात शिकारीच्या उद्देशाने आलेल्या ७ जणांना अटक..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

  गडचिरोली प्रतिनिधी

आलापल्ली शिकारीसाठी गेलेल्या सात युवकांना वनअधिकारी आणि वनकर्मचाऱ्यांनी पडकल आहे. आलापल्ली राखीव वनपरीक्षेत्र 12 मध्ये काही अज्ञात इसम रात्री ११:३० दरम्यान पोलिसांना संशयास्पदरित्या आढळले. पोलीस गस्त घालत असताना हे संशयित पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे शस्त्रासारख्या वस्तू आढळून आल्या.

जंगलात वन्यप्राण्याची शिकार करण्यासाठी हे युवक आले असल्याच उघड झाले आहे. पोलिसांकडून यांना अटक करण्यात आली आहे.  अधिक तपास करीत आहेत. साईनाथ तलांडे,संदीप शामराव मडावी दिलीप मुसली मडावी, बाजीराव सदाशिव तलांडे, अविनाश विठ्ठल मेश्राम, भास्कर मंतु पेंदाम, बापू शँकर वेलादी, विनोद गँगा कोडापे, विकास समय्या आत्राम अशी अटक करण्यात आलेल्या इसमांचं नाव आहे.

सदर कारवाई उपवनसंरक्षक सी.आर. तांबे, उपविभागीय वन अधिकारी नितेश देवगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी किरण पाटील,क्षेत्र सहाय्यक आलापल्ली योगेश शेरेकर ,वनसंरक्षक डी.एस.चिव्हाणे,वनरक्षक आर.एस.मडावी यांनी पार पाडली.

Leave a Comment