Hurun India Rich List 2024 | आपला भारत देश कितीही विकसनशील देश असला, तरी आपल्या देशामध्ये गरीब आणि श्रीमंत ही एक खूप मोठी दरी बनलेली आहे. गरिब हे आणखी गरीब आणि श्रीमंत आणखी श्रीमंत होत चालल्याचा काहीसा प्रकार आता दिसत आहे. आपल्या देशामध्ये अनेक श्रीमंत असे लोक आहेत. ज्यांचा यावर्षी श्रीमंताच्या यादीची समवेश झालेला आहे. आणि या यादीत तब्बल 1539 भारतीयांचा समावेश आहे. या 1539 भारतीयांची एकूण संपत्ती ही 1000 कोटींपेक्षा जास्त आहे. गेल्या वेळी पेक्षा ही संख्या 220 पेक्षा जास्त असल्याची माहिती समोर आलेली आहे. अनेक लोक अशी आहेत. ज्यांची संपत्ती ही 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. आणि त्यांची संपत्ती दिवसेंदिवस वाढत होत चाललेली आहे. या यादीमध्ये यावर्षी पहिल्यांदाच 272 नवीन नव्या दाखल झालेली आहे. म्हणजेच गेल्या पाच वर्षाच्या दरम्यान यावर्षी 86 टक्क्यांनी यात वाढ झालेली आहे. आता या यादीतील पहिल्या दहा श्रीमंत भारतीयांची नावे आणि संपत्ती आपण जाणून घेऊया.
भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत पहिले नाव हे गौतम आदाने यांचे येते. गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 1,161, 800 कोटी रुपये एवढी आहे. यांच्या कंपनीचे नाव आदानी असे आहे. तसेच त्यांचे वय हे 62 वर्ष एवढे आहे. दुसऱ्या क्रमांकातील सर्वात श्रीमंत व्यक्ती हे मुकेश अंबानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही 1, 014,700 कोटी रुपये एवढी आहे. त्यांच्या कंपनीचे नाव हे रिलायन्स इंडस्ट्रीज आहे. तर त्यांचे वय हे सध्या 67 वर्ष एवढे आहे. भारतातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत तिसरे नाव हे शिव नादर यांचे येते. त्यांची एकूण संपत्ती ही 314, 000 कोटी रुपये एवढी आहे. त्यांच्या कंपनीचे नाव एचसीएल एवढे आहेत त्यांचे वय सध्या 79 वर्ष एवढे आहे.
कायरस पुनावाला यांची एकूण संपत्ती ही 289,800 कोटी रुपये एवढी आहे. त्यांच्या कंपनीचे नाव सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया असे आहे. तसेच त्यांचे वय सध्या 83 वर्षे एवढे आहे. देशातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत पाचवे नाव हे दिलीप सांगवी यांचे येते. त्याची एकूण संपत्ती ही 249,900 कोटी रुपये एवढी आहे. त्यांच्या कंपनीचे नाव सन फार्मासिटिक एआय इंडस्ट्रीज असे आहे. देशातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर कुमार मंगलम बिर्ला यांचे नाव येते. त्यांची एकूण संपत्ती ही 235,200 कोटी रुपये एवढी आहे. त्यांच्या कंपनीचे नाव आदित्य बिर्ला असे आहे. तसेच त्यांचे वय सध्या 57 वर्ष आहे .
देशातील सर्वात श्रीमंत (Hurun India rich list 2024) लोकांच्या यादीत सातवे नाव हे गोपीचंद हिंदुजा यांचे येते. त्यांची एकूण संपत्ती 192,700 कोटी रुपये एवढी आहे. त्यांच्या कंपनीचे नाव हिंदुजा असे आहे. त्यांचे वय सध्या 84 वर्ष आहे जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत आठव्या क्रमांकावर राधाकिशन दमानी यांचे नाव येते. त्यांची एकूण संपत्ती 190,900 कोटी रुपये एवढी आहे. त्यांच्या कंपनीचे नाव अवेन्यू सुपरमार्क्स असे आहे. देशातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत नावे अजीम प्रेमजी यांचे येते. त्यांची एकूण संपत्ती ही 190,700 कोटी रुपये आहे. त्यांच्या कंपनीचे नाव विप्रो असे आहे. तसेच देशातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत दहावे नाव हे नीरज बजाज यांचे येते. त्यांची एकूण संपत्ती ही 162, 800 कोटी रुपये एवढी आहे, तर त्यांच्या कंपनीचे नाव बजाज असे आहे.
शाहरुख खानला मिळाली श्रीमंतांच्या यादीत जागा | Hurun India Rich List 2024
भारतीय चित्रपट सृष्टीतील किंग खान म्हणजे शाहरुख खान हा याची देखील पहिल्यांदाच हुरून इंडियाच्या (Hurun India rich list 2024) श्रीमंताच्या यादीत जागा मिळवलेली आहे. त्याची एकूण संपत्ती ही 7300 कोटींपर्यंत पोहोचलेली आहे. चित्रपटसृष्टीतून शाहरुख खान याच्या व्यतिरिक्त जुई चावला, हृतिक रोशन, करण जोहर, अमिताभ बच्चन यांचा देखील श्रीमंतांच्या यादीत समावेश केलेला आहे.