पती-पत्नीचा पाझर तलावात बुडून मृत्यू; पत्नीला वाचताना पतीचाही झाला अंत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

शिराळा तालुक्यातील भाटशिरगांव येथे अर्जुन लक्ष्मण देसाई व सुमन अर्जुन देसाई या शेतकरी दाम्पत्यांचा शेताशेजारील असणाऱ्या पाझर तलाव्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी घडली असून यामुळे संपुर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

भाटशिरगाव येथील अर्जुन लक्षमन देसाई यांचे पाझर तलाव जवळ शेताजवळ वस्ती आहे. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पाझर तलावात पत्नी सुमन बुडत असलेचे निदर्शनास आले. त्यावेली  अर्जुन देसाई यांनी पाण्यात उडी मारून पत्नी सुमन याना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतू त्या मध्ये स्वतःसह दोघे ही बुडाले असावेत असा अंदाज वर्तवला जात आहे.

सदरची बाब तलावा जवळच वस्ती असलेने लहानगा नातू साकेत देसाई याने ही घटना लोकांना सांगितली आहे. दुपारी 3 वाजले पासून तानाजी गोसावी तसेच पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने शोध मोहीम राबवली. सायंकाळी ६ वाजता दोघांचे मृतदेह आढळून आले. यावेळी संपूर्ण गांव हळहळले. शिराळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्या नंतर रात्री उशीरा शोकाकुल वातावरणात भाटशिरगाव मध्ये अंत्य संस्कार करणेत आले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment