व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

अरेच्चा!!! अंड्या वरून सुरू झालेलं नवरा बायकोचे भांडण अंड्याच्या मदतीनेच पोलीसांनी सोडवलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नवरा बायकोचा संसार म्हंटल तर भांडण आणि रुसवा फुगवा हा आलाच. समाजात अनेक नवरा बायकोची भांडणे कोणत्या ना कोणत्या कारणाने होतच असतात. पण एका अंड्या मुळे भांडण लागले अस जर ऐकलं तर तुमचेही डोळे मोठे होतील. पण हो हे खरं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हा प्रकार आहे. हे भांडण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलं तेव्हा या विचित्र भांडणामुळे पोलीसही चक्रावून गेले. पती-पत्नीमध्ये दोन अंड्यांवरुन भांडण झालं. पतीने संध्याकाळी जेवणासाठी दोन अंडे आणले होते. दोन अंड्यांची मला भाजी करून दे असं पतीने पत्नीने सांगितलं.

पत्नीने भाजी केली मात्र ती मुलीला खाऊ घातली. मग नवऱ्याला राग अनावर झाला आणि थेट भांडणाला सुरुवात झाली. वाद वाढत गेला आणि पती-पत्नी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. या आगळ्या वेगळ्या भांडणामुळे गावकरीदेखील पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले.

जेव्हा पोलिसांना समजले की हे भांडण फक्त दोन अंड्यांवरून झालंय तेव्हा पोलीस देखील चक्रावून गेले. त्यामुळे एकतर गुन्हा दाखल करावा की भांडण सोडवावे या पेचात ते पडले. मात्र पती-पत्नी दोघांनाही शांत करत पोलिसांनीच दोन अंडे विकत आणले आणि त्यांच्या हवाली केले आणि तिथेच भांडण मिटलं. हे भांडण मिटलं असलं तरी या निराळ्या भांडणाची आणि पोलिसांनी वाद मिटवण्यासाठी केलेल्या धडपडीची चर्चा सर्वत्र रंगत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’