नवरा बायकोचा वाद विकोपाला गेल्याने नवऱ्याने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – पती- पत्नी म्हंटले तर त्याच्यात या ना त्या कारणावरून वाद होणारच. मात्र नागपूरमधील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये निलेश ठाकूर नावाच्या व्यक्तीचे त्याच्या पत्नीशी एका क्षुल्लक करणारून वाद झाला. या वादामुळे निलेश ठाकूर यांची पत्नी घर सोडून माहेरी निघून गेली. त्यामुळं नीलेशला अतिशय वाईट वाटले. तो चिंता करू लागला. आता घर पत्नीअभावी त्याचं मन रमेना त्यामुळे तो नैराश्यात गेला. यातूनच त्याने आत्महत्या करण्याचे ठरवले.

अशी घडली घटना
घटनेच्या दिवशी मृत निलेश ठाकूर यांचा आपल्या पत्नीबरोबर मोठा वाद झाला. त्यांच्यात नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणातून सतत भांडण होत होते. नेहमीच्या या भांडणामुळं त्याची पत्नीसुद्धा खुप वैतागली होती. ती याअगोदर निलेशला सोडून जाण्याची धमकी द्यायची. या भांडणानंतर खरोखरचं ती नीलेशला सोडून गेली. यामुळे त्याला खूप दुःख झाले. त्यामुळे तो नैराश्यात गेला.

याच नैराश्यातून त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले. यानंतर त्याने कुठूनतरी विष आणले आणि ते घेतले. यानंतर हळूहळू ते विष त्याच्या शरीरात भिनले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एक छोट्याशा वादातून निलेशने जे टोकाचे पाऊल उचलले त्यामुळे सुखी संसाराची पार राख रांगोळी झाली आहे. नागपूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.