पतीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने महिला समुदाय अधिकाऱ्यास मारहाण

corona
corona
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वैजापूर : पतीचा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे पत्नीने चक्क महिला समुदाय आरोग्य अधिकाऱ्यास मारहाण केल्याची घटना तिडी येथे घडली आहे. या प्रकरणी एका महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतीक्षा सुनील अमोलिक श्रीरामपूर तालुक्यात शिवराई येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्ररात समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

१७ जून रोजी प्रतीक्षा आणि आशा सेविका विमल डुकरे या उपकेंद्रर्गत येणाऱ्या तिडी गावातील ग्रामपंचायत कार्यालयात तपासणी करीत होत्या. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास गावातीलच हिराबाई नारायण कोढाळे ग्रामपंचायत कार्यालयात आली. यावेळी संरपच सुदाम आहेर यांनी कोरोना तपासणी करायची आहे का अशी विचारणा केली. प्रतिक्षा अमोलिक या तपासणी किट काढू लागल्या. मात्र काही समजण्याच्या आतच हिराबाई हिने प्रतीक्षा यांची गच्ची धरून त्यांना चापटबुक्कायांनी मारहाण करीत त्यांचे केस ओढले तू १५ दिवसांपूर्वी माझ्या नवर्‍याचे खोटे पॉझिटिव्ह रिपोर्ट काढले होते.

आम्ही आरटीपीसीआर चाचणी केली त्यावेळी ती निगेटिव्ह आली. तुझ्यामुळे लोक मरतील, असे म्हणत त्यांना शिवीगाळ केली. याशिवाय तू तपासणी कशी करते? असा दमही भरला. यावेळी आशा सेविका विमल डुकरे यांनी हिराबाई हिला प्रतीक्षा यांच्यापासून दूर करत सोडवासोडव केली. हिराबाई यांच्या पतीची २८ मे रोजी तिडी येथे कोरोना चाचणी करून घेतली होती. आणि त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. असे या प्रकरणी आरोग्य अधिकारी प्रतिक्षा अमोलिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात हिराबाई कोढाळे विरोध गुन्हा दाखल करण्यात आला.