29 देशांमध्ये आढळला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट – लॅम्बडा, WHO ची वाढली चिंता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जिनिव्हा । जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) बुधवारी सांगितले की,कोरोनाचा एक नवीन व्हेरिएंट 29 देशांमध्ये सापडला आहे. लॅम्बडा नावाचा हा व्हेरिएंट दक्षिण अमेरिकेत पहिल्यांदा सापडला आहे, असे मानले जात आहे. WHO ने वीकली अपडेटमध्ये म्हटले आहे की,” पहिल्यांदा पेरूमध्ये सापडलेला लॅम्बडा व्हेरिएंट हा दक्षिण अमेरिकेत कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांना जबाबरदार आहे.”

पेरूमध्ये लॅम्बडा व्हेरिएंट अधिक प्रभावी असल्याचे आढळले. पेरूमध्ये एप्रिल 2021 पासून, कोरोनातील 81 टक्के प्रकरणे या व्हेरिएंटशी संबंधित आहेत. तर दुसरीकडे, चिलीमध्ये, मागील 60 दिवसात सबमिट केलेल्या सिक्वेन्स मधील 32 टक्के प्रकरणांत हा व्हेरिएंट आढळला आहे. अर्जेटिना आणि इक्वेडोर सारख्या इतर देशांमध्येही या व्हेरिएंटची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

लॅम्बडा व्हेरिएंट बदलतो आहे
WHO ने सांगितले की, लॅम्बडा व्हेरिएंटमध्ये बदल झाला आहे ज्यामुळे त्याच्या संक्रमणाची क्षमता वाढू शकते. तसेच, या प्रकारच्या संसर्गासमोर एंटीबॉडी देखील काम करणार नाहीत. WHO ने पुढे म्हटले आहे की,”लॅम्बडाच्या व्हेरिएंटला अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी अधिक अभ्यास आवश्यक आहेत.”

जेव्हा विषाणूंचे कोणतेही रूप चिंताजनक असते, तेव्हा ते अधिक संसर्गजन्य आहे आणि आपल्याला गंभीर आजारी बनवू शकते असे वैज्ञानिक म्हणतात. या चिंताजनक व्हेरिएंटला ओळखण्यासाठीची चाचणी, उपचार आणि लस देखील त्याविरूद्ध कमी प्रभावी ठरू शकतात.

तथापि, WHO ला अशी भीती वाटते आहे की,” संक्रमणाचा हा व्हेरिएंट जगभरात दुसरीकडे कुठेही पसरु नये. अलीकडेच याच्या डेल्टा व्हेरिएंटने देखील जगाची चिंता वाढविली. ब्रिटनने असा दावा केला आहे की, गेल्या 11 दिवसांत आपल्या देशातील प्रकरणे दुप्पट झाली आणि त्यासाठी डेल्टा व्हेरिएंट जबाबदार असल्याचे मानले जात आहे. ब्रिटनमध्ये कोविड 19 च्या फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून गेल्या 24 तासांत सर्वाधिक 8,125 रुग्ण आढळले आहेत. पब्लिक हेल्थ इंग्लंड (PHE) यांना कळले आहे की, डेल्टा फॉर्म (बी1.617.2) भारतात पहिल्यांदा सापडला. एका आठवड्यात ते सुमारे 30 हजार वरून 42,323 वर गेले आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment