हनिमूनचा अश्लील व्हिडिओ बनवून पतीनेच केले पत्नीला ब्लॅकमेल! पत्नीने उचलले ‘असे’ भयानक पाऊल…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हरियाणाच्या फरीदाबादहून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका नवविवाहित महिलेने आपल्या पतीच्या क्रूरतेमुळे गळफास लावून आत्महत्या केली. जेव्हा संपूर्ण प्रकरण उघडकीस आले तेव्हा लोक चकित झाले. वास्तविक, एनआरआय पतीने नवीन लग्न झालेल्या पत्नीला हनिमूनवर घेऊन जाऊन तिचा अश्लील व्हिडिओ बनविला. त्यानंतर त्याने त्या अश्लील व्हिडिओद्वारे आपल्या पत्नीला ब्लॅकमेल करून हुंड्याची मागणी केली. याचा कंटाळा आल्याने विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली.

नवविवाहितेच्या वडिलांनी सांगितले की, 15 मार्च 2021 रोजी त्यांची मुलगी मेघाचे लग्न फरीदाबादच्या सेक्टर 15 मधील अचल याच्याशी झाले होते. अचल अमेरिकेत राहत होता आणि लग्नानंतर त्याने आपल्या मुलीला अमेरिकेत ठेवण्याची स्वप्ने दाखविली होती. तिचा पती जी मोठी स्वप्ने दाखवत होता. त्यानंतर, त्याने दीड महिन्यात आपला रंग दाखवायला सुरुवात केली. त्यानंतर त्याच्या त्रासाला कंटाळून त्यांच्या मुलीने आत्महत्या केली. ज्या प्रकारे त्यांच्या मुलीने गळफास लावून आत्महत्या केली त्याच प्रकारे आरोपी पतीलाही फाशी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

पीडितेचे नाव मेघा असे सांगण्यात येत आहे. मेघाचे लग्न अचल केसरिया नावाच्या मुलाशी 15 मार्च 2021 रोजी झाले होते. गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेत अचल वास्तवास होता. लग्नाच्या वेळी मेघा आणि तिच्या पालकांना स्वप्न दाखवले होते की त्यांची मुलगी लग्नानंतर अमेरिकेतच राहील, परंतु लग्नानंतर त्यांना आणि मेघाला हे माहित नव्हते की पुढे काय वाढून ठेवले आहे. विडिओ बनवल्या नंतर अमेरिकेत घर आणि गाडी घेण्यासाठी तो मेघा कडून पैश्यांची मागणी करू लागला. पोलिसांनी सांगितले की आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे आणि पुढील कारवाई होत आहे.

You might also like