नवविवाहीत पत्नीच्या आत्महतेनंतर पतीची ऑफिसमध्ये गळफास घेवून आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर | अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे पत्नीपाठोपाठ पतीने ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जामखेड शहरात केवळ चार महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या पती- पत्नीने बुधवारी (दि. १२) दुपारी आत्महत्या केली. अजय कचरदास जाधव (वय ३२), शिल्पा अजय जाधव (वय २८, दोघेही रा. बीड रस्ता, जामखेड शहर) अशी आत्महत्या केलेल्याची नावे आहेत.

चार महिन्यापूर्वी अजय व शिल्पा या दोघांचा मोठ्या थाटात विवाह सोहळा झाला होता. शिल्पा जाधव हिने बुधवारी दुपारी बीड रस्त्याजवळील आदित्य गार्डन शेजारी राहत असलेल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची माहिती तिचा पती अजय जाधव यास समजली. त्यानंतर काही वेळातच अजय यानेही शहरातीलच मोरे वस्ती येथील त्याच्या पाण्याच्या प्लांटमधील ऑफिसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले.

पती-पत्नीने आत्महत्या का केली? याचे कारण समजू शकले नाही. यानंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले. मयताचा भाऊ अभिषेक कचरदास जाधव याने जामखेड पोलीस ठाण्यात या घटनेची खबर दिली. यानंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले. मयताचा भाऊ अभिषेक कचरदास जाधव याने जामखेड पोलीस ठाण्यात या घटनेची खबर दिली.