नागपूर हादरले ! 2 मुलांची आणि पत्नीची हत्या करून पतीचीही आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक हादरवणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आर्थिक अडचणीतून पतीने आपल्या दोन लहान मुलांची आणि पत्नीची हत्या करून स्वतःही आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नागपूरच्या जरीपटका भागामध्ये हि घटना घडली आहे. मदन अग्रवाल असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून तो दोन लहान मुलं आणि पत्नीसह जरीपटका भागात राहत होता.

नेमके काय घडले ?
सोमवारी रात्री रात्री जेवणं करून सर्वजण झोपी गेले होते. त्यानंतर झोपेत असताना आरोपी पतीने पत्नीचा गळा चिरला. त्यानंतर आपल्या दोन लहान मुलांच्या गळ्यावरही चाकू फिरवून त्यांचाही खून केला. पत्नी आणि मुलांची हत्या केल्यानंतर मदन अग्रवाल याने स्वत: विष पिऊन आत्महत्या केली आहे.दुसऱ्या दिवशी दिवसभर घरातून कोणीही बाहेर आले नाही म्हणून शेजाऱ्यांना संशय आला. यानंतर शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.

यानंतर पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता मदन अग्रवाल यांची पत्नी मुलगा-मुलगी यांचे मृतदेह आढळून आले. यानंतर पोलिसांनी घटनास्थाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. मदन अग्रवाल हे गेल्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत सापडले होते. यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. जरीपटका पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment