व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

खळबळजनक ! पत्नी व मुलीची गळा चिरून हत्या करून पतीची आत्महत्या

बीड – जिल्ह्यातील सिरसाळा गावातील मोहा रोडवरील एकाने आपल्या पत्नीचा व दोन वर्षाच्या मुलीचा गळा चिरून खून करून नंतर स्वतः फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री दहाच्या दरम्यान उघडकीस आली. शेख अल्लाबक्षी अहमद (वय 32), पत्नी शबनम व मुलगी आशपिया अशी मृतांचे नावे आहेत. या घटनेमुळे बीड लिहुयातच नव्हे तर मराठवाड्यात खळबळ उडाली आहे.

अल्लाबक्षी हा परळी वैजनाथ येथील थर्मल पाॅवर स्टेशन येथे वेल्डर या पदावर काम करत होता. शुक्रवारी परभणी येथे मामेभावाचा विवाह होता. या विवाहानिमित्त दोघे भाऊ नातेवाईक गेले होते. मी पाठीमागून येत आहे, असे त्याने सांगितले होते. घरात कोणीच नव्हते. यानंतर त्याने या विवाहाला आम्ही पाठीमागून येत आहोत असे सांगितले होते. परंतु दुपारच्या वेळेस घराला बाहेरून कुलूप लावून व घरातील दोन वर्षे मुलगी आशपिया, पत्नी शबनम हिचा गळा चिरून खून केला. नंतर स्वतः फाशी घेऊन आत्महत्या करून आपले जीवन संपवले. या घटनेने खळबळ उडाली आहे.

यानंतर रात्री लग्नाचे नातेवाईक मृत मुलीचे वडील सर्व लग्नाला आले नाही. या चिंतेने परेशान होते. घराचा दरवाजा उघडला असता हा प्रकार उघडकीस आला. या घटनेचे नेमके कारण समजू शकले नाही, परंतु घरगुती वादातून घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला जात आहे. तिघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात करण्यात आले असून या घटनेने सकाळी मृताच्या त्याच्या घरासमोर लोकांनी गर्दी केली होती. या प्रकरणी तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप एकशिंगे करत आहेत.