Sunday, May 28, 2023

अरे बापरे ! अंगावर येऊन बसली 101 किलोची पत्नी आणि मग…

मॉसकाव : वृत्तसंस्था – आपण नशेत असताना काय करतो याचा काही नेम नाही. जेव्हा आपण नशेमधून बाहेर येतो तेव्हा आपल्याला सत्य परिस्थिती समजते. अशी काहीशी घटना मॉसकाव या ठिकाणी घडली आहे. यामध्ये 101 किलो वजन असणारी पत्नी अंगावर बसल्याने पतीचा जागीच मृत्यू झाला आहे. हि घटना घडली तेव्हा पत्नी दारूच्या नशेत होती.

हि घटना रुसमधील एका शहरामध्ये घडली आहे. या घटनेमध्ये पती – पत्नींमध्ये काही कारणावरून वाद झाला होता. हा वाद खूप वाढत गेला. या भांडणादरम्यान पत्नी नशेमध्ये होती. यामध्ये तिने आपल्या पतीला माफी मागण्यास सांगितले मात्र पतीने माफी न मागितल्याने तिचा राग आणखी वाढला आणि ती रागाच्या भरात आपल्या पतीच्या तोंडावर बसली.

पत्नीचे वजन 101 किलो एवढे होते. रागाच्या भरात ती आपल्या पतीच्या तोंडावर बसल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्यामध्येच त्याचा गुदमरून मृत्यू झाला. या सर्व प्रकारादरम्यान त्यांची मुलगी तिकडेच होती. हा सर्व प्रकार बघताच तिने शेजाऱ्यांना बोलावून आणले मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तोपर्यंत तिच्या पतीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी त्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.