धक्कादायक ! मुंबईतून गावी परतल्यानंतर तरुणाने पत्नी आणि मुलाची केली हत्या अन्..

जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानमधील सीकरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका तरुणाने आपली पत्नी आणि मुलाची हत्या करून स्वतःदेखील आत्महत्या केली आहे. आजूबाजूच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघांना शुक्रवारी सायंकाळनंतर घरातून बाहेर पडताना कोणीही पहिले नाही. शनिवारी सायंकाळी गावकऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना तिघांचे मृतदेह आढळून आले.

ही घटना गणेश्वर परिसरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साधारण 10 वाजता काही लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता संपत कुमावतचा मृतदेह खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत होता. तर पत्नी पूजा आणि मुलगा चीनू यांचे मृतदेह पलंगावर होते. प्राथमिक तपासानुसार, पतीने पहिल्यांदा आपली पत्नी आणि मुलाची हत्या केली. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.

मृत महिलेच्या शरीरावर जळाल्याच्या खुणा
मृत महिलेच्या शरीरावर अनेक ठिकाणी जळाल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. मृत संपतचा लहान भाऊ काही कारणासाठी आपल्या आत्याच्या घरी गेला होता. त्यावेळी घरात मृत संपत त्याची पत्नी आणि मुलगा हे तिघेच होते. आजूबाजूच्या लोकांचं म्हणणं आहे की, शुक्रवारी दुपारनंतर तिघांपैकी कोणीच घराबाहेर आले नव्हते. शनिवारी देखील दूध घेण्यासाठी घरातील कोणीच बाहेर पडले नाही. तसेच घराला टाळासुद्धा नव्हता. मृत संपत कुमावत हा आपल्या कुटुंबासह मुंबईत टाइन्स लावण्याचं काम करीत होता.