धक्कादायक! अनैतिक संबंधांना विरोध केल्यानंतर पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून!

नागपूर| अनैतिक संबंध कधी कधी संपूर्ण संसार उद्ध्वस्त करतात. अशीच एक घटना नागपूरमध्ये घडली आहे. पतीच्या अनैतिक संबंधांना विरोध केल्यामुळे पतिनेच पत्नीचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना एमआयडीसी भागातील भीमनगरमध्ये घडली आहे. यामुळे संपूर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

दिप्ती अरविंद नागमोती (वय 26) असे मृत महिलेचे नाव आहे. दिप्तीचा पती अरविंद नागमोती (वय-30) याचे बाहेर अनैतिक संबंध होते. यावरून दोघांमध्ये नेहमी वाद होत असत. दरम्यान अनैतिक संबंधांना घेऊन दोघांमध्ये जास्त वाद होऊ लागले होते. सोमवारी (15 फेब्रुवारी) त्यांच्यामध्ये खूप वाद झाले. आणि ह्या वादाने वेगळे वळण घेतले. या वादात पतीने तिचा खून केला. आणि फरार झाला.

या वादाची आणि अनैतिक संबंधांची कल्पना दिप्तीने सासर आणि माहेरच्या लोकांना देऊन ठेवली होती. यामुळे तिचा भाऊ आणि सासरे हे दोघांच्या मध्ये मध्यस्थी करण्यासाठी सोमवारी दिप्तीच्या घरी जात होती. पण दुपारनंतर दिप्ती फोन उचलत नसल्याने त्यांना शंका आली. व घरी गेल्यानंतर दीप्तीचा मृतदेह कॉटवर पडला होता. दिप्तीच्या भावाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपी फरार आहे. आरोपीचा शोध घेणे सुरू आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like