ठाणे हादरलं ! ‘या’ शुल्लक कारणावरून पतीने केली पत्नीची निर्घृणपणे हत्या

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – ठाणे जिल्ह्यातील भायंदर या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरोपीने आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास हि धक्कादायक घटना घडली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
आरोपी पतीने त्याच्या पत्नीने वाढलेल्या नाश्त्यामध्ये मीठ कमी असल्याने आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आहे. शुक्रवारी सकाळी भायंदर पूर्वच्या फाटक रोड परिसरात हि धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. निलेश घाघ असे या आरोपी पतीचे नाव आहे. घटनेच्या दिवशी सकाळी 9 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास त्याने आपली पत्नी निर्मला यांची गळा आवळून हत्या केली.

पत्नीने वाढलेल्या खिचडीमध्ये मीठ कमी असल्याने नाराज झालेल्या पतीने रागाच्या भरात आपल्या पत्नीची गळा आवळून निर्घृणपणे हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला. तसेच आरोपी पतीविरुद्ध भायंदर येथील नवघर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.