कोर्टाच्या आवारातच पती ने केली पत्नीची भोसकून हत्या

murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी | पोटगी मिळालेल्या पत्नीने जमिनीचा ताबा मिळावा यासाठी सुरु असलेल्या दाव्याचा वादावरून वृद्ध इसमाने वयोवृद्ध पत्नीला धारदार चाकूने सपासप वार करून कोर्टाच्या आवारातच जीवे मारून टाकल्याच्या घटनेने शनिवारी शहरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या गेटसमोर हा थरारक प्रकार घडला. या प्रकरणी पतीसह तिचा सावत्र मुलगा, नातू व एका अनोळखी इसमासह चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

केशरबाई कारभारी गवळी असे मृत महिलेचे नाव आहे. तर कारभारी किसन गवळी अतुल भरत गवळी, भरत कारभारी गवळी व एक अनोळखी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. केशरबाई ही कारभारी गवळी यांची पहिली पत्नी आहे. कारभारी यांनी बिजलाबाई हिच्यासोबत दुसरे लग्न केल्याने केशरबाई माहेरी भिंगी येथे गेल्या ४०वर्षापासून राहत होत्या. पती कारभारी यांच्या कडून पोटगी पोटी केशरबाई यांना घायगाव शिवारात ४ एकर ३३ गुंठे जमीन मिळालेली आहे.

मात्र त्याजमिनीचा ताबा बिजलाबाई यांचा मुलगा भरत व नातू अतुल हे देत नव्हते. त्या जमिनीचा ताबा द्यावा यासाठी न्यायालयात वाद सुरु होता. या न्यायालयीन सुनावणी साठी आल्या होत्या तेथे आरोपी व त्याच्या साथीदाराने त्यांना घेरले व तेथेच त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आले. हल्ल्यात केशर बाई यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’