Thursday, March 30, 2023

लाॅकडाउनमध्ये प्रेयसीसोबत फिरणार्‍या पतीला पत्नीने रंगेहाथ पकडले; आणि पुढे झाले असे काही…

- Advertisement -

मुंबई । मुंबईतील पेडर रोडवर शनिवारी सायंकाळी एक नाट्यात्मक प्रकार पाहायला मिळाला. एक महिलेने आपल्या नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत पाहिले. आणि तिने रोडवरच राडा केला. नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत पाहून भडकलेल्या या महिलेने भर रस्त्यात गोंधळ घालायला सुरुवात केली. भररस्त्यात सुरू असलेल्या गोंधळामुळे वाहनांच्याही रांगा लागल्या होत्या. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अगदी फिल्मी स्टाईल मध्ये या महिलेने ट्राफिक जाम केले होते.

शनिवारी संध्याकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास एक तीस वर्षीय व्यक्ती काळ्या रंगाच्या रेंज रोव्हर कारमधून एका महिलेसोबत जात होता. ते पेडर रोडवर पोहोचल्यानंतर पांढऱ्या कारमधून त्यांचा पाठलाग करणारी त्या व्यक्तीची पत्नी त्याला गाडी थांबवायला भाग पाडते. त्याची पत्नी थेट रेंज रोव्हरच्या समोर जाऊन उभी राहते आणि जोरजोरात गोंधळ घालायला सुरूवात करते. पती गाडीचा दरवाजा उघडत नाही त्यामुळे खिडकीतून पतीला मारहाण करण्याचाही ती प्रयत्न करताना या व्हिडिओमध्ये दिसतंय. शेवटी ही महिला थेट गाडीच्या बोनटवर चढून कारच्या काचेवर बूट मारायला सुरूवात करते. असे या व्हिडिओमध्ये दिसते आहे.

- Advertisement -

https://twitter.com/theteefactory/status/1282225894656847872

ही महिला बाजूलाच उभ्या असणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांचांही नाही आहे. अखेर पती कारच्या बाहेर येतो, मग त्याला ही महिला लाथांनी मारहाण करते. नंतर दोघे पांढऱ्या कारमध्ये बसतात. पण थोड्याचवेळात त्याची पत्नी पु्न्हा गाडीतून उतरुन पळत जात दुसऱ्या कारमध्ये बसलेल्या महिलेला मारहाण करते. अखेर पोलिस मध्यस्थी करुन त्या महिलेची सुटका करतात. दरम्यान, या घटनेनंतर ट्रॅफिक पोलिस दोन्ही गाड्या आणि त्या दाम्पत्याला घेऊन गावदेवी पोलीस ठाण्यात पोहोचले. पण त्यांनी तक्रार करण्यास नकार दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर, महिलेवर रस्त्यावर अडथळा निर्माण करुन ट्रॅफिक जॅम केल्याबद्दल चलान आकारण्यात आले आहे.

https://twitter.com/Spidey_e/status/1282293032889581568

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.