विहीरीत पडलेल्या बायकोला वाचवण्यासाठी त्यानेही उडी मारली,आणि पुढे…..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पिण्याचे पाणी भरायला गेलेल्या पत्नीचा विहिरीत पाय घसरल्याने तिला वाचवायला गेलेल्या पतीचा देखील मृत्यू झाला. बळसाणे येथे या नव दाम्पत्याचा बुडून मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गाव हळहळला आहे.

रब्बी हंगाम सुरु असल्याने शेतकरी लक्ष्मण पंढरीनाथ रत्नपारखे (वय 27) हे पत्नी अंजूबाई लक्ष्मण रत्नपारखे (वय 22) यांच्या सह शेताची काम उरकत होते. यादरम्यान, पती लक्ष्मण यांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी पत्नी अंजू या विहिरीत पाणी आणण्यासाठी गेल्या. पाणी काढत असताना त्यांचा तोल गेला आणि त्या विहिरीत पडल्या. हे पहाताच लक्ष्मण यांनी पत्नी अंजूला वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली.

परंतु, विहिरीत पाण्याची पातळी जास्त असल्याने दोघेही जण तळाला गेल्याने नव दाम्पत्याचा पाण्यात बुडून दुर्दैवाने मृत्यू झाला. घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच पोलिस प्रशासनाला माहिती देण्यात आली. येथील सरपंच दरबारसिंग राजपूत यांच्यासह गावकरी आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment