हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Hyderabad Airport Bomb Threat। अहमदाबाद विमान अपघाताची घटना अजूनही ताजी असतानाच आता हैद्राबाद मधून आणखी एक धक्कादायक घटना समोर येत आहे. हैद्राबाद बेगमपेट विमानतळ बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी एका अज्ञात व्यक्तीकडून देण्यात आली आहे. ईमेलच्या माध्यमातून हि धमकी मिळाली असून या धमकीनंतर तेलंगणा विशेष संरक्षण दल, सीआयएसएफ आणि इतर सुरक्षा पथके घटनास्थळी दाखल झाली. सुरक्षेच्या उपाय म्हणून विमानतळ कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले आहे.
बॉम्ब निकामी पथक दाखल – Hyderabad Airport Bomb Threat
अलर्टनंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशिक्षित कुत्रे आणि बॉम्ब तज्ञांकडून विमानतळाची कसून तपासणी केली जात आहे. कोणत्याही संशयास्पद वस्तूंसाठी सुविधा तपासण्यासाठी बॉम्ब निकामी करणारे तज्ञ देखील तैनात करण्यात आले होते. सायबर क्राइम अधिकाऱ्यांकडून धमकीच्या मेलची चौकशी सुरू झाली असून हा धमकीचा मेल कोणी पाठवला आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. याव्यतिरिक्त, विमानतळ प्राधिकरणाने सुरक्षा उपाययोजनांचे समन्वय साधण्यासाठी आणि जमिनीवरील बदलत्या परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी आपत्कालीन प्रतिसाद पथक सक्रिय केले. बेगमपेट विमानतळावरून सध्या नियमित प्रवासी उड्डाणांऐवजी गैर-व्यावसायिक आणि व्हीआयपी उड्डाणे होत असल्याने या बॉम्ब धमकीच्या बातमीने मोठा असा परिणाम झाला नाही.
बेगमपेट विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त यांनी सांगितलं कि सकाळीच ही धमकी (Hyderabad Airport Bomb Threat) कळवण्यात आली, यानंतर घटनास्थळी बॉम्ब निकामी पथक तैनात करण्यात आले आणि विमानतळ आणि त्याच्या आसपासच्या परिसरात कडक तपासणी करण्यात आली. आम्ही सध्या बॉम्ब पथकासह विमानतळ आणि त्याच्या परिसराची कसून तपासणी करत आहोत. तपासानंतर या एकूण घटनेबाबत संपूर्ण माहिती दिली जाईल असं पोलिस आयुक्तांनी सांगितलं. दरम्यान, अहमदाबाद विमान अपघातानंतर देशात विमानाच्या संदर्भांत दररोज कोणत्या ना कोणत्या बातम्या समोर येतच आहेत. विमानात तांत्रिक बिघाड, इमर्जन्सी लँडिंग, फ्लाईटला उशीर या गोष्टी तर सतत कानावर पडतच आहेत. त्यातच आता विमानतळच बॉम्बने उडवून देण्याची धमकी (Hyderabad Airport Bomb Threat) आल्याने खळबळ उडाली आहे.




