Monday, January 30, 2023

क्रिकेट विश्वाला मोठा धक्का ! वयाच्या ३३व्या वर्षी ‘या’ भारतीय फास्ट बॉलरचे निधन

- Advertisement -

हैदराबाद: वृत्तसंस्था – हैदराबादचा फास्ट बॉलर अश्विन यादव याचे शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. तो ३३ वर्षांचा होता. अश्विन यादव याच्या जाण्याने भारतीय क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला आहे. अश्विन याने २००७ मध्ये मोहालीमध्ये रणजी ट्रॉफी सामन्यातून पदार्पण केले होते. अश्विन यादवच्या माघारी पत्नी व ३ मुले असा परिवार आहे.

अश्विन यादव याची कारकीर्द
अश्विन याने हैदराबादकडून खेळताना १४ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ३४ विकेट घेतल्या होत्या. तसेच त्याने १० लिस्ट ए सामनेसुद्धा खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला ४ विकेट मिळाल्या होत्या. २००८-०९ मध्ये त्याने दिल्लीविरुद्ध ५२रन देऊन ६ विकेट घेतल्या हि त्याची कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी होती.अश्विनने २००९ मध्ये मुंबईविरुद्ध शेवटचा रणजी सामना खेळला होता. यानंतर तो स्टेट बँक ऑफ हैदराबादसाठी स्थानिक क्रिकेट खेळायचा.

- Advertisement -

अश्विन यादवच्या मृत्यूवर भारतीय टीमचे बॉलिंग प्रशिक्षक आर.श्रीधर यांनीदेखील दुःख व्यक्त केले आहे. ‘अश्विन यादवच्या निधनाची बातमी ऐकून मी गळून पडलो आहे. तो नेहमी आयुष्य जगायचा आणि कायम टीमसाठी खेळायचा. अश्विन शानदार फास्ट बॉलर होता. त्याच्या कुटुंबाला हे दु:ख पचवण्याची शक्ती मिळो, ही इश्वर चरणी प्रार्थना. तुझी कायमच आठवण येईल,’ असे ट्विट करत आर.श्रीधर यांनी अश्विन यादवला श्रद्धांजली वाहिली आहे. ऑफ स्पिनर विशाल शर्मा याने देखील अश्विन यादवच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. अश्विन हा नेहमी हसतमुख असायचा. तो टीमसाठीच कायम खेळायचा. अश्विनचा मृत्यू झाला आहे, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही असे मत विशाल वर्मा याने व्यक्त केले आहे.