हैदराबाद एन्काऊंटर प्रकरण लोकशाहीसाठी वेकअप कॉल- सरकारी वकील उज्वल निकम

0
69
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । मागील काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये २६ वर्षीय वेटरनरी डॉक्टर वर बलात्कार करून या तरुणीला जाळून मारण्यात आले होते. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला आहे. हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण देश हादरला होता. यानंतर हैद्राबाद पोलिसांकडून या प्रकरणातील आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आला होता.

सर्व स्तरातून त्यानंतर हैदराबाद पोलिसांचे कौतुक झाले होते. यावर आता विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी भाष्य केले आहे.  ”हैद्राबाद एन्काऊंटर प्रकरणात सर्वसामान्य लोकांनी जल्लोष करणं ही चिंताजनक बाब आहे” असे वक्तव्य त्यांनी केले आहे. तसेच ‘सध्या गुन्हेगारांना लवकर शासन होत नाही ही जनतेच्या मनातील सल या निमित्ताने समोर आले आहे. त्यामुळे हा लोकशाहीसाठी वेकअप कॉल असल्याचे’ त्यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here