Hydro Generator | उन्हाळ्यात लाईट नसतानाही घ्या पंख्याची हवा, ‘हे’ जुगाड वापरून घरीच करा वीजनिर्मिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Hydro Generator | संपूर्ण भारतात उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे. त्याचप्रमाणे घरात बसून देखील मोठ्या जास्त प्रमाणात उष्णता जाणवत आहे. घरात बसल्यावरही सतत आपले कुलर आणि पंखे चालू ठेवायला लागतात. त्याचप्रमाणे उन्हाळ्यामध्ये लोडशेडिंगच्या देखील अनेक समस्या उद्भवतात. खेड्यात बऱ्याचदा वेळा लाईट जाते आणि कितीतरी तास येतच नाही. परंतु अशावेळी घरात बसायचं कसं? असा प्रश्न अनेकांना पडतो. उन्हाळ्यामध्ये कुलर आणि फॅनची हवा घेण्यासाठी घरात अनेक लोक जनरेटर किंवा इन्व्हर्टर लावतात. परंतु या दोन्ही गोष्टी सगळ्यांनाच परवडत नाहीत, कारण त्यांच्या किमती खूप जास्त आहेत.

तुम्ही देखील जर उन्हाळ्यात लाईट जात असतील म्हणून जनरेटर किंवा इन्वर्टर बसवण्याचा विचार करत असाल, तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण तुम्ही अत्यंत कमी पैशांमध्ये असे एक उपकरण बसवून पाण्याच्या टाकीतून वीज निर्मिती करू शकता. यासाठी जास्त खर्च देखील येत नाही. शिवाय घरातल्या पाण्याच्या टाकीतच हे काम होतं. या उपकरणाचं नाव हायड्रो जनरेटर (Hydro Generator) असे आहे.

हायड्रो जनरेटरचे फायदे

हायड्रो जनरेटर हे एक असे उपकरण आहे. ज्यामुळे तुम्ही तुमच्या घरातील पाण्याच्या टाकीतून वीज निर्मिती करू शकता. आता तुम्ही तुमच्या पाण्याची टाकीत हायड्रो जनरेटर बसून वीजनिर्मिती कशी करू शकता?याची संपूर्ण प्रक्रिया आपण जाणून घेऊया.

वीज निर्मिती कशी होते? | Hydro Generator

हायड्रो जनरेटर हे उपकरण पाण्याच्या वेगानुसार काम करत असते. पाण्याच्या पाईप सारख्या दिसणाऱ्या हायड्रोजन टर्बाइन आणि कनेक्टेड लावलेला असतो. याचाच अर्थ तुम्ही टर्बाईनमधून वीज निर्मिती करू शकता. आता हा जनरेटर पाण्याचे टाकीत कसा बसवायचा ते पाहूया.

हायड्रोजनरेटर कसा बसवायचा ?

हे हायड्रो जनरेटर (Hydro Generator)पाण्याचे टाकीमध्ये तुम्हाला अशा प्रकारे बसवावे लागेल, की टाकीतून पाणी बाहेर जाते तेव्हा त्या पाईपमधून जाईल. अशा प्रकारे तुम्ही हायड्रोजन लेटरला बसवलेले टर्बाइन नीट बसून ते काम करू शकता. हे टर्बाइन वीज निर्मिती करण्याचे काम करते. यामध्ये तुम्ही कोणतीही बॅटरी चार्ज करू शकता. त्या बॅटरीचा वापर करून तुम्ही तुमचा स्मार्टफोन चार्ज करू शकता. त्याचप्रमाणे घरातील पंखा आणि लाईट देखील लावू शकता. हे हायड्रोजनरेटर तुम्हाला ऑनलाईन देखील उपलब्ध होईल. ॲमेझॉन किंवा flipkart वरून तुम्ही हे खरेदी करू शकता. हायड्रोजनरेटरची किंमत ही त्याच्या आकारावर अवलंबून असते.