हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Hydrogen Train । मागच्या काही वर्षात भारतीय रेल्वेचा चेहरामोहराच बदलला आहे. रेल्वेच्या ताफ्यात वंदे भारत एक्सप्रेस, वंदे भारत साधारण, वंदे मेट्रो, मोनोरेल यांसारख्या नव्या अत्याधुनिक ट्रेन दाखल झाल्या. दुसरीकडे बुलेट ट्रेनचे कामही प्रगतीपथावर असून भारतीय रेल्वेसाठी हि मोठी उपलब्धी मानली जातेय. त्यातच आता रेल्वे विभागाने आणखी एक मोठा कारनामा केला आहे. भारतात प्रथमच हायड्रोजन ट्रेन पाहायला मिळाली आहे. नुकतंच रेल्वेमंत्र्यांकडून या हायड्रोजन ट्रेनची यशस्वी चाचणी पार पडली. त्यामुळे लवकरच ती प्रवाशांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे. देशातील या पहिल्यावहिल्या हायड्रोजन ट्रेनची वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण आज जाणून घेऊयात.
तर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी घोषणा केली की चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) येथे देशातील पहिल्या हायड्रोजन-चालित कोचची (Hydrogen Train) यशस्वी चाचणी करून भारतीय रेल्वेने एक मोठा टप्पा गाठला आहे. भारत 1,200 HP हायड्रोजन ट्रेन विकसित करत असून यामुळे हायड्रोजन-चालित ट्रेन तंत्रज्ञानात भारत आघाडीवर असेल,” असे वैष्णव यांनी X वरील एका पोस्टमध्ये म्हंटल. त्यामुळे या हायड्रोजन ट्रेनबाबत देशातील नागरिकांना मोठी उत्सुकता लागली आहे. हि ट्रेन धावते तरी कशावर? तीच वर्किंग कस आहे? याबाबत माहिती घेणं आवश्यक बनलं आहे.
कोणत्या मार्गावर धावणार?-
मित्रांनो, देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन (Hydrogen Train) हि एक नॉन-एसी ट्रेन असेल आणि जगातील सर्वात लांब हायड्रोजन ट्रेन असेल. ज्यामध्ये 2 हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या पॉवर कार म्हणजेच इंजिन बसवले आहेत. या ट्रेन मध्ये ८ प्रवासी कोच असतील. ही ट्रेन सर्वात आधी हरियाणामध्ये धावेल. त्याठिकाणी जिंद आणि सोनीपत या रेल्वेमार्गावर ती सर्वात आधी धावताना दिसेल. प्रतितास 110 किमी या वेगाने ती धावेल. खास करून कमी अंतराच्या प्रवासासाठी या हायड्रोजन ट्रेनची निर्मिती करण्यात आली आहे.
कोणत्या इंधनावर धावणार? Hydrogen Train
आता राहिला महत्वाचा प्रश्न तो म्हणजे हि हायड्रोजन ट्रेन नेमकी कोणत्या इंधनावर धावणार.. कारण कोणत्याही ट्रेनला चालवण्यासाठी ऊर्जा स्त्रोताची आवश्यकता असते.. पूर्वी रेल्वे कोळशावर चालायच्या, त्यानंतर हळूहळू ती वीज आणि डिझेलवर धावू लागली . परंतु हि हायड्रोजन ट्रेन हि पूर्णपणे हायड्रोजनवर चालवली जाणार आहे. यामध्ये हायड्रोजन वायू टाकीमध्ये भरला जाईल. बाहेरील हवेतून ऑक्सिजन घेतला जाईल. दोन्हीच्या रासायनिक अभिक्रियेतून ऊर्जा तयार केली जाईल आणि त्यावर हि रेल्वे धावेल. ट्रेनमध्ये बॅटरी सिस्टम देखील असेल, जी हायड्रोजन इंधन सेलद्वारे चार्ज केली जाईल. हायड्रोजनपासून तयार होणारी वीज बॅटरीमध्ये साठवली जाईल. त्यानंतर ते एका तांत्रिक प्रक्रियेतून जाईल आणि ट्रेनच्या एक्सलवर बसवलेल्या ट्रॅक्शन मोटर्सपर्यंत पोहोचेल. या ऊर्जेचा वापर करून ट्रेन धावेल.