Hyundai Tucson 2022 : ह्युंदाईची नवी Tucson बाजारात लॉन्च; पहा फीचर्स आणि किंमत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतात गेल्या काही महिन्यांपासून अनेक कार कंपन्यांनी (Hyundai Tucson 2022) आपल्या वेगवेगळ्या गाड्या बाजारात आणल्या आहेत. त्यातही अनेक कंपन्यांनी एसयूव्ही सेगमेंटवर आपला फोकस वाढवला आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोरियन वाहन उत्पादक कंपनी ह्युंदाईने आपली नवी Tucson SUV लॉन्च केली आहे. hyundai ची Tucson SUV कंपनीच्या Sensuous Sportiness डिझाईन भाषेवर आधारित असून सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत बर्‍याच प्रमाणात अपडेट केली आहे.

पहा या SUV ची वैशिष्ट्ये- 

या नव्या Tucson (Hyundai Tucson 2022) ला 10.25-इंच फुल-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, पॅनोरॅमिक सनरूफ, पॉवर-अ‍ॅडजस्टेबल फ्रंट रो व्हेंटिलेटेड सीट्स, 360-डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक पार्किंग-आयआरव्हीएम आणि ऑटोमॅटिक पार्किंग कीलेस एंट्री सारख्या वैशिष्ट्यांसह बऱ्याच सुविधा आहेत. तसेच ब्लूलिंक कनेक्टेड कार टेक्नोलॉजी बटरफ्लाय-स्टाईल स्टीयरिंग व्हील, पॅनोरमिक सनरूफ आणि व्हेंटिलेटेड सीट्स या फीचर्सचा देखील समावेश आहे.

Hyundai Tucson 2022

Tucson 2022 चे इंजिन- (Hyundai Tucson 2022)

Hyundai टक्सन २०२२ ही पॉवरफुल इंजिनसाठी ओळखली जाईल. या Tucson मध्ये 2.0-लिटर एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिले गेले आहे जे 152 PS आणि 192 Nm टॉर्क जनरेट करेल . यासोबत 2.0-लिटर डिझेल इंजिन देखील आहे, जे 185 पीएस पॉवर आणि 400 Nm टॉर्क निर्माण करते. तसेच, टॉप-एंड ट्रिममध्ये पर्यायी 4WD कॉन्फिगरेशन देखील मिळेल.

Hyundai Tucson 2022 लाँच; पहा फीचर्स आणि किंमत..

 

काय असेल किंमत-

या नव्या Hyundai Tucson ची किंमत सुमारे 25 लाख ते 30 लाख रुपये (Hyundai Tucson 2022) (एक्स-शोरूम) पर्यंत असू शकते. ही गाडी SUV Citroen C5 Aircross आणि Jeep Compass ला तगडी फाईट देईल.

हे पण वाचा:

Toyota Urban Cruiser Hyryder 2022 : Toyota ची Urbun Cruiser Hyryder लॉन्च; सेल्फ चार्जिंगचे दमदार फीचर्स

Audi A8 L 2022 :बाजारात धुमाकूळ घालणार Audiची A8 L लक्झरी सेडान; BMW, मर्सिडीजला देणार तगडी फाईट

TVS Ronin 225 : बुलेटला टक्कर देणार TVS ची Ronin 225; पहा वैशिष्ट्ये आणि किंमत

Maruti Suzuki Brezza 2022 : मारुती सुझुकीने लॉंच केली नवी Brezza; पहा वैशिष्ट्य आणि किंमत

Whatsapp ने आणले नवे फीचर्स; 2 दिवसांपूर्वीचा मेसेजही डिलीट करता येणार

Leave a Comment