Hyundai Tucson 2022 : Hyundai Tucson मध्ये काय आहे खास; पहा या आलिशान SUV च्या विविध प्रकारांच्या किमती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ह्युंदाई मोटर इंडियाने (Hyundai Tucson 2022) अलीकडेच त्यांची फ्लॅगशिप SUV Tucson देशात लॉन्च केली. नवीन 2022 Hyundai Tucson प्लॅटिनम आणि सिग्नेचर या दोन ट्रिम लेव्हलमध्ये ऑफर केली आहे. या कारचे पाच प्रकार आहेत, ज्यांची किंमत 27.70 लाख पासून 34.39 लाख रुपयांपर्यंत आहे. आज आपल्या कार रिव्हिव मध्ये जाणून घेऊया या SUV बाबतच्या काही खास गोष्टी आणि गाडीची किंमत…

फीचर्स– (Hyundai Tucson 2022)

नवीन Hyundai Tucson अनेक वैशिष्ट्यांसह येते. यात LED लाइटिंग सिस्टीम, 10.25-इंच इंफोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, बोस साउंड सिस्टम, पॅनोरॅमिक सनरूफ आणि सभोवतालची प्रकाश व्यवस्था मिळते. याशिवाय, त्याला लेव्हल-2 ADAS मिळते. यात 19 प्रकारची सुरक्षा वैशिष्ट्ये देखील आहेत, ज्यात लेन कीप असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग, ब्लाइंड स्पॉट व्ह्यू मॉनिटर आणि बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे.

Hyundai Tucson 2022

गाडीचे इंजिन-

गाडीच्या इंजिन (Hyundai Tucson 2022) बाबत बोलायचं झालं तर, ही SUV पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्यायांमध्ये लॉन्च केली आहे. या SUV ला 2.0-लिटर नैचुरली -इस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे. यात 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळतो जे 154 Bhp आणि 192 Nm पीक टॉर्क जनरेट करते. तसेच या SUV ला 2.0-लिटर टर्बो डिझेल इंजिन देखील आहे जे 184 Bhp आणि 416 Nm पीक टॉर्क जनरेट करते. यात मल्टिपल ड्राइव्ह आणि टेरेन मोडसह ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टम मिळते.

Hyundai Tucson 2022

व्हेरिएंट नुसार किमती-

गाडीच्या किमतीबाबत बोलायचं (Hyundai Tucson 2022) झाल्यास, या SUV ची किंमत तिच्या व्हेरिएंट नुसार वेगवेगळी आहे. त्यानुसार,

-Hyundai Tucson Platinum Petrol AT- 27.70 लाख रुपये,

-Hyundai Tucson Platinum Diesel AT- 30.20 लाख रुपये

-Hyundai Tucson Signature Petrol AT- 30.17 लाख रुपये

-Hyundai Tucson Signature Diesel AT- 32.87 लाख रुपये

-Hyundai Tucson Signature Diesel AT 4WD- 34.39 लाख रुपये आहे.

हे पण वाचा :

Citroen C3 Launch : दमदार फीचर्ससह Citroen C3ची भारतात धमाकेदार एन्ट्री; पहा काय आहे किंमत

Ola सादर करणार आपली पहिली इलेक्ट्रिक कार; 15 ऑगस्टचा मुहूर्त साधणार

Hyundai Palisade 2022 : ह्युंदाईची ही 7 सीटर SUV लवकरच बाजारात; पहा फीचर्स आणि किंमत

Renault Kiger 2022 : नवीन अपडेटसह लॉंच झालेली Renault Kiger बाजारात घालणार धुमाकूळ; पहा फीचर्स आणि किंमत

Royal Enfield Hunter 350 : दमदार फिचर्स आणि स्टाइलिश लूकसह लॉंच होणार hunter 350 बुलेट